परभणीत कन्हैय्याकुमार आज साधणार युवकांशी संवाद

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑगस्ट 2017

परभणीः 'भारत वाचवा, भारत घडवा' या विषयावर आधारित व विद्यार्थी नेता कन्हैय्याकुमार यांच्या नेतृत्वाखालील संघर्षयात्रा आज (शनिवार) परभणीत येणार असून, या निमित्ताने कन्हैयाकुमार युवकांशी संवाद साधणार आहे.

तेलंगण राज्यातून आज ही यात्रा परभणीत पोचत असून, श्री मंगल कार्यालयात सायंकाळी पाच वाजता या यात्रेच्या स्वागतासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

ऑल इंडिया स्टुडेंट्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि ऑल इंडिया यूथ फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनांनी कन्याकुमारी येथून १५ जुलैपासून देशव्यापी जनजागरण संघर्ष यात्रा सुरू केली आहे. १२ सप्टेंबर रोजी शहीद भगतसिंग हुतात्मा राजगुरू व शहीद सुखदेव यांच्या हुतात्मा स्मारका जवळ समारोप करण्यात येणार आहे. या संघर्ष यात्रेचे नेतृत्व कन्हैय्याकुमार करीत आहेत.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:

Web Title: parbhani news kanhaiya kumar in parbhani

टॅग्स