परभणीत उद्या निघणार सर्वात मोठी दुचाकी रॅली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

मुंबईच्या मराठा क्रांती मोर्चाची जय्यत तयारी

परभणीः मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मुंबईत निघणाऱ्या मराठा क्रांती मुक मोर्चाची परभणी जिल्ह्यात जंगी तयारी केली जात आहे. जिल्हा, तालुका आणि गाव ठिकाणी बैठकावर जोर दिला जात असून,  सोशल मिडीयावरही साद घातली जात आहे. मोर्चाच्या जनजागृतीसाठी शहरात उद्या (शुक्रवार) भव्य दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे. त्यासाठी मोठी तयारी पूर्ण झाली अत्यंत शिस्तीत आणि घालवून दिलेल्या आचारसंहिता पाळीत ही रॅली निघणार आहे.

मराठा समाजाच्या मागण्यांकडे सातत्याने होणारे दुर्लक्ष यामुळे समाजात मोठा असंतोष पपसरला आहे. महाराष्ट्रसह, देशविदेशात मोर्चे काढुनही सरकारने पध्दतशीरपणे डोळेझाक केली असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे आता मुंबईत ऑगस्ट क्रांतीदिनी (ता. नऊ) जगातील सर्वात मोठा मोर्चा निघणार आहे, त्यासाठी राज्यभर तयारी केली जात आहे. परभणीत मोर्चाच्या जनजागृतीसाठी दुचाकी रॅली काढली जाणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन सकाळी 10 वाजता रॅलीस सुरुवात होणार आहे. त्यासाठी परिसरात असलेल्या आंदोलन मैदानात गाड्या एकत्र येणार आहेत. तेथून ही रॅली स्टेशन, बसस्थानक, उड्डानपूल, जिल्हापरिषद, रायगड कॉर्नर, विसावा फाटा येथुन वळसा घेत जिल्हा शासकीय रुग्णालय, शिवाजी चौक, गांधी पार्क, नारायण चाळ, विसावा कॉर्नर, पुन्हा शिवाजी महाराज पुतळा ते वसमत रोड, शिवाजी महाविद्यालय या मार्गे जात संत तुकाराम महाविद्यालयाच्या प्रांगणात रॅलीचा समारोप होणार आहे.

अगदी शांततेत आणि शिस्तीत रॅली काढण्यात येणार आहे. रॅली दरम्याण आचारसंहिता पाळली जाणार आहे. त्यासाठी ठिकठिकाणी स्वंयसेवक उभे राहणार आहेत. रॅलीत युवक, विविध पक्षाचे कार्यकर्त्ये, पदाधिकारी सहभागी होणार आहेत. त्यासाठी परभणी शहरासह तालुक्यात तयारी सुरु झाली आहे. मुबंई, औरंगाबाद नंतर आता परभणीत जनजागृती रॅली काढली जात आहे. मुंबई मोर्चाची एक रंगीत तालीम असल्याचे रॅलीतून दिसत आहे. परभणीच्या रॅलीसाठी युवकासंह जेष्ठातही कमालीचा उत्सुकता असून, मागील आठवडा भरापासून रॅलीसासाठी दुचाकीवर स्टिकर, भगवे झेंडे लावुन रॅलीसाठी जागृती केली जात आहे.

बैठकांना वेग, सोशल मिडीयाही सक्रीय
जिल्हाभरात मुंबईच्या मोर्चासाठी बैठकावर जोर दिला जात आहे. मुंबईला जाण्याचा मार्ग, तेथील व्यवस्था, परतीची वेळ याबाबत माहीती दिली जात आहे. आठ तारखेला रेल्वे गाड्यात होणारी गर्दी लक्षात घेता येत्या सहा ऑगस्ट पासून मुंबईकडे रवाना होण्याचे आवाहन केले जात आहे. त्यासाठी मुंबईतील व्यवस्था याचीही माहीती करुन दिली जात आहे. मोर्चासाठी सोशल मिडीया अधिक सक्रीय झाला आहे. कुण्या गावात बैठकीत काय झाले, तयारी कुठवर आली याची माहीती सर्वांना दिली जात आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: parbhani news maratha kranti morcha and bike rally