परभणी जिल्ह्यात एका वर्षात बसचे 54 अपघात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 जून 2017

परभणी - सुरक्षित प्रवासाची हमी देणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसेसना केवळ परभणी जिल्ह्यात एकाच वर्षात तब्बल 54 अपघात झाल्याची माहिती समोर अीाल आहे. विशेष म्हणजे दहा अपघात प्रवाशांचा जीव घेणारे ठरले तर 35 अपघातातील प्रवासी गंभीर जखमी झाले.

परभणी - सुरक्षित प्रवासाची हमी देणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसेसना केवळ परभणी जिल्ह्यात एकाच वर्षात तब्बल 54 अपघात झाल्याची माहिती समोर अीाल आहे. विशेष म्हणजे दहा अपघात प्रवाशांचा जीव घेणारे ठरले तर 35 अपघातातील प्रवासी गंभीर जखमी झाले.

कांगारू प्राण्याप्रमाणे महामंडळाची बस प्रवाशांना सुरक्षित प्रवास घडवत असल्याचा दावा महामंडळाकडून करण्यात येतो. कांगारू आपल्या पिल्लाला पोटातील पिशवीतून घेऊन जात असल्याचे चित्र महामंडळाने बोधचिन्हामध्ये वापरले आहे. "बसचा प्रवास सुखी व सुरक्षित प्रवास' असे घोषवाक्‍य देऊन प्रवाशांना सुरक्षिततेची खात्री देण्यात येते. मात्र, एकट्या परभणी जिल्ह्यात महामंडळाच्या बसेसना 2016-17 या वर्षात 54 अपघात झाल्याचे समोर आले आहे. चालू 2017 या वर्षात बसेसचे एकूण सात अपघात झाले आहेत.

असे अपघात घडू नयेत यासाठी महामंडळाकडून प्रयत्न करण्यात येतात. मात्र हे प्रयत्न पुरेसे यशस्वी ठरलेले नाहीत. परभणी जिल्ह्यातील अपघातांमागे रस्त्यांची दयनीय अवस्था, वाहतूक नियमांची ऐशी-तैशी, प्रमाणाबाहेर प्रवाशी वाहतूक, अतिक्रमण, अरूंद रोड, पूल, रस्त्यावर वाहने उभा करणे आदी कारणे आहेत.

त्यातील दहा अपघातात प्रवाशांना जीव गमवावा लागला. विद्यमान वित्तीय वर्षाच्या पहिल्याच एप्रिल महिन्यात तीन अपघात झाले. मे महिन्यात चार घटना घटल्या. हे सर्व गंभीर स्वरूपाचे अपघात असले तरी सुदैवाने जिवीत हानी झाली नाही. ती गतवर्षी अधिक झाली. त्यात बसपेक्षा बाहेरील प्रवाशांना प्राण गमवावे लागले. बसमधील चार प्रवाशांचा त्यात समावेश असून उर्वरित चार दुचाकीस्वार, दोन पादचारी आणि एक कार चालक होता. असे वारंवार अपघात घडणाऱ्या ठिकाणाची नोंद परभणीच्या विभागीय कार्यालयाने केली आहे. ज्या ठिकाणी अपघात होतात त्याच ठिकाणी पुन्हा अपघात होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्यासाठी उपाययोजना केल्या जातात.

जिल्ह्यातील अपघात स्थळे
गंगाखेड-परळी रोडवरील नैकोटा फाटा व करम पाटी, ऑटो रिक्षा आणि रस्त्यावर विक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे परभणीतील काळी कमान, परभणी बसस्थानकाचे दोन्हीही प्रवेशद्वार, पाथरी-माजलगाव दरम्यान आष्टी फाटा, परभणी-पाथरी दरम्यानचा किन्होळा पाटी, जिंतूर-मंठा रोडवरील खडक पाटीचा वळण रस्ता, जिंतूर-सेनगाव रोडवरील एलदरी धरणावरील अरूंद पुल, परभणी-वसमत रोडवरील झिरो फाटा, परभणी-जिंतूर रोडवरील डीटीएड कॉलेजजवळ अतिक्रमणामुळे रस्ता अरूंद होवून अपघात होत आहेत.

Web Title: parbhani news marathi news maharashtra news bus accident MSRTC