परभणी: वीजेचा शॉंक लागून युवकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 जून 2017

गंगाखेड (जि. परभणी) - शेताला पाणी देण्यासाठी शेतातील विहिरीवरील विद्युत मोटार सुरु करताता वीजेचा जोरदार धक्का लागून एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

गंगाखेड (जि. परभणी) - शेताला पाणी देण्यासाठी शेतातील विहिरीवरील विद्युत मोटार सुरु करताता वीजेचा जोरदार धक्का लागून एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्‍यातील मौ. अकोली येथील तरुण शेतकरी गणेश विठ्ठल पोले (वय 19) हा सकाळी आठच्या सुमारास शेतात गेला होता. शेताला पाणी देण्याच्या उद्देशाने त्याने विहिरीवरील विद्युत मोटार सुरु करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी त्याला वीजेचा जोरदार धक्का बसला. या धक्‍क्‍यामुळे गणेश बाजूला फेकला गेला. त्यानंतर नातेवाईकांनी त्याला पाहिले आणि त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथे उपचारादरम्यान गणेशचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्युमुळे गावावर शोककळा पसरली आहे. या प्रकरणाची गंगाखेल पोलिसात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी गंगाखेल पोलिस अधिक तपास करत आहेत.

■ 'ई सकाळ'वरील ताज्या बातम्या
चित्रपट निर्मात्याविरोधात नीरजा भनोतचे कुटुंबीय न्यायालयात
औरंगाबादेत पेट्रोलपंपावर छापे; वैधमापनशास्त्र पथकाकडून मोजमाप
बुलडाणा जिल्ह्यात स्वाभिमानीचे 'धोंडी धोंडी कर्ज दे' आंदोलन
धुळे : कर्मचाऱ्यांची वाट पाहता स्वच्छता करण्याचा तरुणांचा निर्धार!
डोंबिवलीत कामगाराला आले 62 हजार रुपये वीजबिल
आर्ची-परशा, सचिन-सुप्रिया, अशोकमामा येणार 'ई सकाळ'वर लाईव्ह
सोलापूरमध्ये वीजबिल भरणा केंद्रे सुटीतही राहणार सुरू
‘नकुशी’मध्ये होणार उषा नाडकर्णी यांची एंट्री
शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांच्या पोर्टलमध्ये 'एरर'
'कष्टकरी व सरकारी कर्मचाऱयांचे प्रश्न गांभीर्याने सोडविण्याची गरज'

Web Title: parbhani news marathi news maharashtra news youth death