अन् त्यांनी तहसील कार्यालयातच केला मयताचा अंत्यविधी (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

महसूल प्रशासन झाले हतबल, देवला पुनर्वसन स्मशानभुमीचा प्रश्न पेटला

सेलू (परभणी): तालुक्यातील लोअर दुधना प्रकल्पाच्या उभारणीमुळे सेलू शहरालगत सातोना-परतूर रोडवर पुर्नवसित देवला पुनर्वसन या गावाचा स्मशानभुमीचा प्रश्न पेटला. येथील मयताच्या नातेवाईकांनी आज (बुधवार) तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच अंतिम संस्कार केल्यामुळे प्रशासनाची धांदल उडाली.

महसूल प्रशासन झाले हतबल, देवला पुनर्वसन स्मशानभुमीचा प्रश्न पेटला

सेलू (परभणी): तालुक्यातील लोअर दुधना प्रकल्पाच्या उभारणीमुळे सेलू शहरालगत सातोना-परतूर रोडवर पुर्नवसित देवला पुनर्वसन या गावाचा स्मशानभुमीचा प्रश्न पेटला. येथील मयताच्या नातेवाईकांनी आज (बुधवार) तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच अंतिम संस्कार केल्यामुळे प्रशासनाची धांदल उडाली.

सेलू शहरालगत असलेल्या देवला पुर्नवसन येथील आश्रोबा दगडोबा पंढुरे (वय ७०) यांचे वृद्धापकाळाने मंगळवारी (ता. १८) रोजी रात्री नऊच्या सुमारास वाजता निधन झाले. आश्रोबा पढुंरे यांच्या निधनानंतर दुखाचे सावट असणार्‍या त्यांच्या कुटुंबियासोबत मयताचे अंतिम संस्कार कोठे करावयाचे हा प्रश्न निर्माण झाला. गेल्या दहा वर्षापासून देवला पुनर्वसन येथील स्मशानभूमीचा प्रश्न एैरणीवरच आहे. मयतांच्या नातेवाईकांनी रात्रभर विचार करुन आज सकाळी महसुल प्रशासनासी संपर्क साधला. मात्र, देवला पुनर्वसन येथील स्मशानभुमी प्रकरणातील तांत्रीक आडचणी व मयतांच्या नातेवाईकांचे म्हणने यात मार्ग निघणे अवघड होवुन बसले. त्यामुळे मयताच्या नातेवाईकांनी आज दूपारी एक वाजता आश्रोबा पंढूरे यांचे पार्थीव शहरातील अत्रेनगर परिसरातील तहसिल कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आणून ठेवले.

मयताचे अंतिम संस्कार तहसिल कार्यालयाच्या मुख्य प्रवेश द्वारावर करणार असल्याचे समजल्या नंतर महसुल प्रशासनाची चक्रे फिरली. तत्काळ घटना स्थळावर बाहेरगावी असलेले तहसिलदार स्वरूप कंकाळ हे  हजर झाले. त्यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी देवीदास जाधव, भुमिअधिग्रहण व भुसंपादन संस्थेचे अधिकारी पोलिस निरिक्षक श्री. चौरे व लोकप्रतिनिधी यांच्यासोबत चर्चा करुन घटना टाळण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, आज सकाळी अकरा वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत म्हणजे तब्बल तीन तास सर्व विभागाच्या संबंधित अधिकारी यांच्याशी चर्चा झाल्यानंतर देवला पुनर्वसन येथील स्मशानभुमीचा प्रश्न तत्काळ सुटण्याची शक्यता धुसर झाली. म्हणून संतप्त नातेवाईकांनी प्रशासनाची चर्चा सुरु असतांनाच तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर अंत्यविधी करण्यासाठी सरण रचले व दुपारी दोन वाजून पंधरा मिनीटांनी मयत आश्रोबा पंढुरे यांच्या पार्थीवाला त्यांचा मुलगा विठ्ठल पंढुरे यांनी अग्नी दिला.

यावेळी मयताची पत्नी राजुबाई पंढुरे, दुसरा मलगा भाऊसाहेब पंढुरे आदींसह नातेवाईक ग्रामस्थ असे दोनशे ते आडीचशे नागरीक अंतिमसंस्काराच्या वेळी घटनास्थळावर उपस्थित होते. देवला पुनर्वसन येथील मयतावर तहसिल कार्यालय परीसरात अंतिम संस्कार झाल्यानंतर देखील शहरातील नगरपालिका, महसुल, भुमि अधिग्रहण आदी प्रशासकिय कार्यालय देवला पुनर्वसन ग्रामस्थांचा स्मशानभुमिचा प्रश्न सोडवणार का? अशीच चर्चा शहरात सुरु होती.

तो पर्यंत आमची स्मशानभूमी तहसिल कार्यालयच
लोअर दूधना प्रकल्प धरणासाठी करजखेडा, देवला व चांदेश्वर या तीन गावाचे पुर्नवसन सेलू शहरालगत सातोना-परतूर रस्त्यावर गट नं.२३५ मध्ये महाराष्र्ट शासनाने पाच हेक्टर ५५ आर जमिन फेरफार क्रमांक १६५४ नूसार संपादित केली. या ठिकाणी सुरूवातीच्या काळात तेथील नागरिकांनी स्मशानभूमीसाठी सोडलेल्या जागेत अंत्यविधी केले. परंतू जमिन मालकाने मी भूमिहीन होत असल्याचे कारण पूढे करून ती स्मशानभूमीची जागा परत घेतली. त्यामुळे येथिल ग्रामस्थांचा स्मशानभूमीचा प्रश्न एैरणीवर आला. गेल्या दहा वर्षापासून येथील ग्रामस्थ स्मशानभूमीसाठीची मागणी संबधित प्रशासनाकडे करीत आहेत. माञ, महसूल प्रशासन त्याची दखल घेत नसल्याकारणे तेथील ग्रामस्थांनी आज थेट तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच अंत्यविधी केला. जो पर्यंत आमचा स्मशानभूमीचा प्रश्न सुटणार नाही तो पर्यंत आमची स्मशानभूमी तहसिल कार्यालयच असेल अशी चर्चा देवला पूर्नवसनचे ग्रामस्थ यावेळी करित होते.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: parbhani news Mary's funeral done in Tahsil office in selu