मोदींना खु्र्ची प्रिय: तोगडिया

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

परभणी: जीएसटी साठी अर्धा रात्री संसदेत बैठक घेतली जाते तर राम मंदीरासाठी का नाही? असा प्रश्न उपस्थित करून आयोध्येत राम मंदीर निर्माणासाठी केंद्र सरकारला कायदा करावा लागेल. पंतप्रधानांना खुर्चीचा मोह असेल पण आम्हाला राम मंदीर प्रिय आहे, असा टोला विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला. त्यांनी आज (शुक्रवार) परभणीत कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया हे एका खासगी कार्यक्रमासाठी शुक्रवारी परभणीत आले होते. कार्यक्रमाला जाण्यापूर्वी त्यांनी परभणी-हिंगोली व नांदेड जिल्हयातील विहिंप व बजरंगदल कार्यकर्ते व पदाधिकाऱ्याशी संवाद साधला.

डॉ. तोगडिया म्हणाले, सोमनाथाचे मंदीर ज्या पध्दतीने उभारले त्या पध्दतीनेच राम मंदिराचे निर्माण कार्य सुरु आहे. भारतीय जनता पक्षाची राम मंदीराच्या आश्वासनावर देशात सत्ता आली आहे. हे ध्यानात घेऊन मोदी सरकारने संसदेत राम मंदीर उभारणीसाठी कायदा केला पाहिजे. न्यायालयाच्या निर्णयाने आम्हाला मंदीरासाठी जागा नको कारण या निर्णयात मंदिरालगतच मशिदीला जागा दिली जाईल. हे आम्हाला मान्य नाही. त्यासाठी संसदेत कायदा करूनच राम मंदीराचे निर्माण झाले पाहिजे अशी आमची आग्रही भूमिका आहे. सत्तेत बसून तीन वर्ष उलटले तरी केंद्र सरकार कायदा करू शकत नाही ही गंभीर बाब आहे. ज्या पध्दतीने देशात जीएसटी कर प्रणाली लागू करण्यासाठी अर्ध्या रात्री बैठक बोलावली जाते मग राम मंदीरासाठी विलंब का असा प्रश्न ही त्यांनी यावेळी उपस्थित केला. पंतप्रधानाना त्यांची खर्ची प्रिय असेल पण आम्हाला राम मंदीर प्रिय आहे. देशातील हिंदू लवकरच अल्पसंख्याक होण्याची भिती आहे. त्यामुळे हिंदूंचा राजसत्तेवर कब्जा राहीला पाहिजे यासाठी देशाचा पंतप्रधानापासून जबाबदारीचे व मोठ्या पदावर फक्त हिंदू माणुसच विराजमान झाला पाहिजे मग कोणत्याही पक्षाचा का असेना त्यासाठी कायदा केला गेला तर पुढील पाच वर्षासाठीही देशात भाजपची सत्ता येणार असल्याचा दावा ही त्यांनी यावेळी केला.

यावेळी विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रमंत्री शंकर गायकर, प्रांतमंत्री अनंत पांडे, प्रांत सहमंत्री ललीत चौधरी, दादा शेरकर, अप्पाजी बारगजे, हेमंत चौधरी, जिल्हा मंत्री सुनील रामपुरकर, आमदार डॉ. राहूल पाटील, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांची उपस्थिती होती.

Web Title: parbhani news narendra modi ram mandir politics dr pravin togadia