परभणी: हातावर लिहुन एकाची गळफास घेऊन आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

  • समतानगर मधील घटना
  • हातावर लिहुन ठेवले आत्महत्येचे कारण
  • चार महिन्यापुर्वी मुलांनेही केली होती आत्महत्या.

सेलू (परभणी): येथील समता नगर भागातील रहिवासी शंकर विश्वनाथ हुडेकर (वय ४५) यांनी आज (मंगळवार) राहत्या घरी छताच्या हूकाला दोरीच्या साह्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली. सेलू पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्युची नोंद झाली. दरम्यान, आत्महत्येस पत्नी, सासू, सासरा, मेहुणा, मेहुणी जबाबदार असल्याचे हुडेकर यांनी आत्महत्यापुर्वी डाव्या तळाहातावर सुसाईड नोट लिहुन ठेवली आहे.

शंकर हुडेकर हे ग्रामिण भागात जावून वैद्यकिय उपचार करीत होते. आज घरातील सर्व मंडळी झोपेत असतांना त्यांनी एका खोलीत छताच्या हूकाला दोरीच्या सह्याने गळफास घेवून आत्महत्या केली. सकाळी सातच्या सुमारास घरची मंडळी झोपेतून जागे झाल्यानंतर त्यांना हा प्रकार दिसला. दरम्यान, सेलू पोलिस ठाण्याचे बीट जमादार संजय साळवे यांच्यासह पोलिस कर्मचारी यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला.

चार महिन्यापुर्वी मुलांनेही केली होती आत्महत्या
हुडेकर यांचा मुलगा निलेश (वय १४) याने चार महिन्यापुर्वीच अभ्यासाच्या  तणावातून गळफास घेवून आत्महत्या केली होती. त्यापाठोपाठच अवघ्या चार महिन्यातच वडील शंकर हुडेकर यांनी आत्महत्या केल्याने शहरात खळखळ उडाली आहे. या कुटुंबात पत्नी आणि एक छोटा मुलगा आहेत.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: parbhani news one suicide in selu