परभणीः विद्यार्थीनींनी एक तास बसेस रोखल्या

विलास शिंदे
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

सेलू (परभणी): सेलू-डासाळा-आष्टी ही एस.टी.बस फेरी पाथरी आगाराने आचानक रद्द केल्याने या मार्गावरिल खवणे पिंपरी, राधे धामणगाव, देऊळगाव (गात) येथील शालेय विद्यार्थीनींची आडचन झाली. वेळेवर शाळेत जाता न आल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी भाजप युवा नेत्या मेघना बोर्डीकर यांच्या नेतृत्वात आज (गुरूवार) सकाळी साडेदहाच्या सुमारास सेलू बसस्थानकात ठिय्या आंदोलन करत एक तास एस.टी. बसेस रोखल्याने बस वाहतूक ठप्प झाली. दरम्यान आगार प्रमुखाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

सेलू-डासाळा-आष्टी ही एस.टी. बस फेरी पाथरी आगाराने आचानक रद्द केल्यामुळे बुधवार व गुरूवारी या मार्गावरिल विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. मानव विकास योजनेची एस.टी. बसही पंक्चर झाल्याने या मार्गावरील विद्यार्थ्यांना सलग दोन दिवस शाळा व महाविद्यालयात वेळेवर जाता आले नाही. आज सेलू-आष्टी ही जनरल एस.टी. बस फेरी आचानक रद्द केल्यामुळे तीन गावच्या विद्यार्थ्यांना पायपिट करून देऊळगाव (गात) पाटी पर्यंत यावे लागले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलन कले.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: parbhani news selu student stop buses