सेलू: पावसाच्या पाण्याने पडले धरणाच्या उजव्या कालव्याला भगदाड

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 ऑगस्ट 2017

लोअर दूधना प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून संथगतीने सूरू असल्याने त्या शिवारात येणार्‍या लाभक्षेञातील शेतकर्‍यांचे पाण्याअभावी सतत नूकसान होत अाहे.४८ किलो मिटर लांबीचा असलेल्या या उजव्या कालव्याचे काम सद्य:स्थितीत  ४२ किलो मिटर पर्यंत प्रगतीपथावर अाहे.

सेलू : लोअर दूधना प्रकल्प धरणाच्या उजव्या कालव्याच्या दोन्ही साईडने ड्रेन न काढल्यामुळे सोमवारी (ता.१४) रोजी झालेल्या जोरदार पावसामुळे कालव्याचे तिन ठिकाणी पिचिंग फूटून मोठ मोठे भगदाड पडून डिग्रस ( जहांगीर ) शिवारातील शेतकर्‍यांच्या शेतातील माती खरडून त्या कालव्यात दूरवर वाहून गेल्याने शेतकर्‍यांचे अातोनात नूकसान झाले.संबधित अधिकारी व कंञाटदारावराची तत्काळ चौकशी करावी व त्यांच्यावर योग्य ती करावाही करावी अशी मागणी संबधित शेतकर्‍यांनी केली अाहे.

लोअर दूधना प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून संथगतीने सूरू असल्याने त्या शिवारात येणार्‍या लाभक्षेञातील शेतकर्‍यांचे पाण्याअभावी सतत नूकसान होत अाहे.४८ किलो मिटर लांबीचा असलेल्या या उजव्या कालव्याचे काम सद्य:स्थितीत  ४२ किलो मिटर पर्यंत प्रगतीपथावर अाहे. या ४२ किलो मिटर पर्यंतच्या उजव्या कालव्याच्या दोन्ही साईडने ड्रेन काढण्यासाठीच्या जमिनी शासनाने संपादित केल्या अाहेत.बहूतांश शेतकर्‍यांना त्याचा मावेजाही शासनाने दिला असूनही संबधित अधिकार्‍यांनी व कंञाटदारांनी कालव्याच्या दोन्ही बाजूने ड्रेन काढणे अपेक्षित असतांनाही ते काम न केल्याने सोमवारी रोजी दूपारी साडेचारच्या सुमारास झालेल्या पावसात या कालव्याला डिग्रस (जहांगीर) शिवारात तिन ठिकाणी मोठ मोठे भगदाड पडून त्यामधून शेतकर्‍यांनी लागवड केलेल्या खरिपाच्या पिकांतून मोठ्या प्रमाणात माती खरडून वाहून गेली.त्यामुळे शेतकर्‍यांचे अातोनात नूकसान झाले.या झालेल्या नूकसानी बाबत त्या अधिकार्‍यांची व कंञाटदारांची तत्काळ चौकशी होवून त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी या नूकसानग्रस्त शेतकर्‍यांतून होत अाहे.

शासनाने उजव्या कालव्याच्या दोन्ही बाजूने जमिनी संपादित केल्यानंतरही संबधित अधिकार्‍यांनी व कंञाटदारानी वेळीच कालव्याच्या दोन्ही बाजूने ड्रेन  केले असते तर संबधित शेतकर्‍यांचे नूकसान टळले असते.त्या अधिकार्‍यांची व कंञाटदारांची चौकशी करून नूकसानग्रस्त शेतकर्‍यांना तत्काळ भरपाई द्यावी अशी मागणी डिग्रस (जहांगीर) येथिल शेतकरि गुलाब पौळ यांनी या वेळी केली.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :

Web Title: Parbhani news water leakage on dam in selu

टॅग्स