परभणी: पूर्णा प्रकल्पात केवळ तीन टक्केच पाणीसाठा

राजाभाऊ नगरकर
शनिवार, 15 जुलै 2017

प्राप्त माहितीनुसार येलदरी धरणाच्या जलाशयात शुक्रवार (ता.१३) पर्यंत ४४८.६३०मि.मी.पाणीपातळी म्हणजे तीन टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध होता.धरणाची एकूण पाणीसाठा १४९.७९६ दशलक्ष घनमीटर असून उपयुक्त पाणीसाठा २५.११९ दशलक्ष घनमीटर आहे.

जिंतूर : पाणलोट क्षेत्रातील अपुरा पाऊस व वरच्या भागातील खडकपूर्णा धरणाच्या पाणीपातळीतहि वाढ झाली नसल्याने तालुक्यातील येलदरी येथील पूर्णा प्रकल्पात सद्यस्थितीत केवळ तीन टक्केच पाणीसाठा उपलब्ध आहे.

पावसाळा सुरु होऊन दीड महिना झाला तरी अद्याप पर्यंत तालुक्यात पावसाचे प्रमाण फारच कमी रहिले. जो तुरळक प्रमाणात पाऊस पडला त्यावर पिके सुध्दा शेवटपर्यंत तग धरणे कठीण आहे. पूर्णा प्रकल्पाचे पाणलोट क्षेत्र धरणापासून ४०-४२ लांबीचे असून या भागात गेल्या दीड महिन्यात पावसाचे प्रमाण फारच अल्प राहिल्याने धरणाच्या जलाशयाच्या पाणीपातळीत वाढ झाली नाही.परिणामी  पूर्णा प्रकल्पावर जलविद्युत निर्मिसह जिंतूर तालुक्याप्रमाणे परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील चारशेपेक्षा जास्त गावांची तहान भागवली जाते शिवाय हजारो हेक्टर शेती सिंचनासाठी येथील पाण्याचा उपयोग होतो. त्यामुळे पावसाने यापुढेही अशीच पाठ फिरवल्यास भविष्यात धरणावर अवलंबून असलेल्या गावांना पिण्याच्या पाण्याचा व नदीकाठच्या शेती सिंचनाची समस्या गंभीर बनण्याची भिती आहे.

प्राप्त माहितीनुसार येलदरी धरणाच्या जलाशयात शुक्रवार (ता.१३) पर्यंत ४४८.६३०मि.मी.पाणीपातळी म्हणजे तीन टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध होता.धरणाची एकूण पाणीसाठा १४९.७९६ दशलक्ष घनमीटर असून उपयुक्त पाणीसाठा २५.११९ दशलक्ष घनमीटर आहे.

धरणाच्या वरील भागात याच (पूर्णा) नदीवर बुलढाणा जिल्ह्यात खडकपूर्णा प्रकल्प आहे.येथील पाणीपातळीतही वाढ झाली नसल्याने शुक्रवारपर्यंत जलाशयात ५.२४ टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती समजली.

ई सकाळवरील ताज्या बताम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: Parbhani news water storage in Purna dam