परभणी : एकीकडे नुकसानीचे पंचनामे सुरु त्यातच पावसाची हजेरी  

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 30 September 2020

जिल्ह्यातील सर्वच भागात बुधवारी दुपारी जोरदार पावसाने हजेरी लावली. परभणी जिल्ह्यात सर्वच तालुक्यात कमी अधिक प्रमाणात हा पाऊस झाला. बोरी परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली तर वालूर परिसरात सुसाट वारा आणि मेघगर्जनेसह एक तास मुसळधार पाऊस झाला.

परभणीः जिल्ह्यात सर्वच तालुक्यात बुधवारी (ता.३०) दुपारपासून कमी अधिक प्रमाणात पावसाचे आगमन झाले. आधी पडलेल्या पावसाने सोयाबीन व कापूस पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरु असतानाच हा पाऊस म्हणजे शेतकऱ्यांची चिंता वाढविणारा ठरत आहे.

परभणी जिल्ह्यात जवळपास सर्वच तालुक्यात कुठे कमी तर कुठे अधिक प्रमाणात बुधवारी सायंकाळी पाऊस झाला. हा पाऊस पिकांसाठी नुकसानीचा असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचापरभणीतील पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाला दंडाची शिक्षा -

पावसाने शेतकरी अडचणीत

पूर्णा तालुक्यातील ताडकळस परिसरात दुपारी दोन वाजेनंतर पावसास सुरुवात झाली. मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. सेलू तालुक्यात दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सुसाट वारे व मेघगर्जनेसह पावसाचे आगमन झाले. तालुक्यातील वालूर, देवगाव फाटा या भागात जोरदार पाऊस झाला. जिंतूर तालुक्यातही पावसाने हजेरी लावली होती. जिंतूर शहरासह बोरी परिसरात दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. शेत शिवारात काही ठिकाणी सोयाबीनची कापनी सुरु असून पावसामुळे शेतकऱ्यांची हेळसांड होत आहे. परभणीत शहरात पावसाच्या तुरळक सरी बरसल्या. परंतू झरी गावाशेजारील शिवारात जोरदार पाऊस झाला. सोनपेठ तालुक्यात दुपारी दोननंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. वातावरणामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. पाथरी व मानवत तालुक्यात मात्र पावसाने सायंकाळपर्यंत हजेरी लावली नव्हती.

येथे क्लिक करा परभणी : कडसावंगीकरांची आश्‍वासनांवर केली जाते बोळवण; मूलभूत समस्या जशास तशा

वालूरमध्ये एक तास पाऊस

सेलू ः बुधवारी (ता.३०) दुपारी तीनच्या सुमारास सुसाट वारा सुरू होऊन मेघगर्जनेसह एक तास मुसळधार पाऊस झाल्याने उरल्या सुरल्या खरिप पिकांना फटका बसला. वालूर (ता.सेलू) गावात भरलेल्या आठवडी बाजारात पावसामुळे दानादान उडाली. व्यापारी, नागरिक मोठी तारांबळ उडाली. शेतात असणारे मेघगर्जना, सुसाट वारा व वीजेचा लखलखाटाने भयभीत झाले. काही दिवसांपासून पावसाची उघडीप राहिल्याने शेतात काही ठिकाणी काढणीस आलेले सोयाबीन व फुटत असलेल्या कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जवळपास एक तास जोरदार पाऊस झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. वालूर, हातनुर, केमापुर, देवगावफायटा, रायपुर, चिकलठाणा परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली.

संपादन ः राजन मंगरुळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parbhani: On the one hand, the panchnama of loss has started and the presence of rain parbhani news