Parbhani : ऑनलाइन शैक्षणिक व्‍यवस्‍थापन प्रणालीमुळे विद्यापीठाच्‍या शैक्षणिक कार्यात सुसूत्रता येणार Parbhani Online education management system streamline | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठा

Parbhani : ऑनलाइन शैक्षणिक व्‍यवस्‍थापन प्रणालीमुळे विद्यापीठाच्‍या शैक्षणिक कार्यात सुसूत्रता येणार

परभणी : ‘‘ऑनलाइन शैक्षणिक व्‍यवस्‍थापन प्रणालीमुळे विद्यापीठाच्‍या शैक्षणिक कार्यात सुसूत्रता येणार आहे. विविध शैक्षणिक प्रक्रिया स्‍वयंचलित होणार आहेत. यामुळे विद्यापीठाच्‍या कार्यप्रणालीत पारदर्शकता येणार असून, वेळेची आणि श्रमाची बचत होणार आहे.

नवीन राष्‍ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अभ्‍यासक्रम राबविण्‍यास मोठा हातभार लाभणार आहे,’’ असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इन्‍द्र मणी यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि भारतीय कृषी सांख्यिकी संशोधन संस्था नवी दिल्‍ली यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने नाहेप प्रकल्‍पांतर्गत शैक्षणिक व्‍यवस्‍थापन प्रणाली यावर दोनदिवसीय कार्यशाळा येथे घेण्यात आली.

यावेळी ते बोलत होते. राहुरी येथील महात्‍मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, भारतीय कृषी सांख्यिकी संशोधन संस्‍थेचे प्रमुख डॉ. सुदीप मारवाह, आयटी सल्‍लागार डॉ. आर. सी. गोयल, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले आदींची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. सुदीप मारवाह म्‍हणाले, ‘‘शैक्षणिक व्‍यवस्‍थापन प्रणालीमुळे सर्व शैक्षणिक कार्य वेळेत पूर्ण होऊन विद्यार्थ्यांचे विविध अभ्‍यासक्रमातील प्रवेशापासून ते पदवी अभ्‍यासक्रम पूर्ण होईपर्यंत सर्व माहिती प्रणालीत अद्यायावत होणार आहे.

यात अभ्‍यासक्रम व्‍यवस्‍थापन, विद्यार्थी व्यवस्‍थापन, विद्याशाखा व्‍यवस्‍थापन, ई-लर्निंग आणि ऑनलाइन शुल्‍क संकलन यांचा समावेश आहे. यामुळे विद्यापीठाची कार्यक्षमता वाढीस लागणार आहे. याचा लाभ विद्यार्थ्‍यांना होणार आहे.

’’ डॉ. रणजित चव्हाण यांनी प्रास्‍ताविक केले. मुख्‍य अन्‍वेषक डॉ. गोपाल शिंदे यांनी नाहेप प्रकल्‍पातील उपक्रमांची माहिती दिली. डॉ. वीणा भालेराव यांनी सूत्रसंचालन केले. आभार डॉ. रवींद्र शिंदे यांनी मानले.

कार्यक्रमास विद्यापीठ अंतर्गत असलेल्‍या विविध महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता डॉ. सय्यद इस्माईल, डॉ. जया बंगाळे, डॉ. बी. एम. ठोंबरे, डॉ. जे. ई. जहागीरदार, डॉ. एस. डी. बांतेवाड, डॉ. आर. डी. अहिरे, डॉ. बी. व्ही. आसेवार, डॉ. के. आर. कांबळे, डॉ. आर. बी. क्षीरसागर आदींसह प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला.

माहिती एका क्लिकवर

मार्गदर्शनात डॉ. गोयल म्हणाले, ऑनलाइन शैक्षणिक व्‍यवस्‍थापन प्रणाली माध्यमातून संस्थेची प्रत्येक शैक्षणिक माहिती विद्यार्थी, प्राध्यापक आणि प्रशासक यांना एका क्लिकवर कुठेही आणि केव्हाही उपलब्ध होणार आहे.

डॉ. धर्मराज गोखले यांनी विद्यापीठाने शैक्षणिक व्‍यवस्‍थापन प्रणाली करिता विद्यापीठ करीत असलेल्या कार्याची माहिती दिली. दोन दिवसातील तांत्रिक सत्रात डॉ. आर. सी. गोयल, श्रीमती रजनी गुलिया आणि श्रीमती निशा यांनी शैक्षणिक व्यवस्थापन प्रणाली (एएमएस), ऑनलाईन शिक्षण प्रणाली, ई - लर्निंग आदींबाबत मार्गदर्शन केले.