esakal | परभणी : उघड्यावरची हागणदारी म्हणजे मानवासाठी कलंक -'सीईओ' शिवानंद टाकसाळे 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

आपल्या गावाच्या सन्मानासाठी शौचालयाचा नियमित वापर करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी शनिवारी (ता.१३) केले आहे

परभणी : उघड्यावरची हागणदारी म्हणजे मानवासाठी कलंक -'सीईओ' शिवानंद टाकसाळे 

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी : ग्रामीण भागात उघड्यावर असणारी हागणदारी म्हणजे मानवाला लागलेला कलंक असून तो पुसून काढण्यासाठी प्रत्येकाने आपल्या व आपल्या गावाच्या सन्मानासाठी शौचालयाचा नियमित वापर करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी शनिवारी (ता. १३) केले आहे.

निपाणी टाकळी (ता. सेलू) या ग्रामपंचायतीमध्ये माझा गाव सुंदर गाव उपक्रमांतर्गत गावातील नागरिकांशी प्लास्टिक मुक्ती आणि स्वच्छता या विषयावर संवाद साधण्यात आला.

यावेळी पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, गट विकास अधिकारी विष्णू मोरे, गटशिक्षणाधिकारी गणराज यरमाळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ सोनवणे, सहाय्यक गटविकास अधिकारी डी एस अहिरे, सरपंच सपना सावंत, उपसरपंच लहानाप्पा हारकळ, माजी सरपंच प्रकाश मुळे, दिगंबर गिराम, ग्राम विकास अधिकारी जयराम नटवे, सीडीपीओ कच्छवे, संवाद तज्ञ ज्ञानेश्वर गायकवाड, स्वच्छ भारत मिशनचे कर्मचारी व गावकऱ्यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

हेही वाचाविशेष स्टोरी : श्री गुरुग्रंथ साहिबमध्ये महाराष्ट्राच्या 'या' संतांच्या दोह्यांचा समावेश; जाणून घ्या, त्या संतांची महती

श्री. टाकसाळे म्हणाले, गाव स्वच्छतेत युवकांनी पुढाकार घ्यावा म्हणजे गावे स्वच्छ व्हायला वेळ लागणार नाही तसेच शिक्षक, ग्रामसेवक आणि अंगणवाडीताई यांनी शौचालयाचा नियमित वापर करण्यासाठी नागरिकांना प्रवृत्त करावे,  प्लास्टिकच्या अतिवापरामुळे गावातील नाल्या तुंबतात, दूषित पाण्यामुळे आणि डासांमुळे डेंग्यू, कॉलरा, हत्तीरोग, टॉयफाईड सारखे आजार बळावतात म्हणून प्लास्टिक आणि अस्वच्छतेला हद्दपार केले पाहिजे, सांडपाण्यासाठी लोकसहभागातून शोष खड्डे करावेत आणि पाण्याची साठवणूक केली पाहिजे, मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणे का गरजेचे आहे, मोबाईल, टीव्ही, मोटायसायकल यापेक्षा स्त्रियांच्या सन्मानासाठी शौचालय किती महत्त्वाचे आहे, पशु पक्ष्यांसाठी पाणवठे तयार करणे अशा विविध विषयांवर शिवानंद टाकसाळे यांनी ग्रामीण भाषा शैलीतून नागरिकांशी संवाद साधला.

संपादन- प्रल्हाद कांबळे