परभणी :गाव स्वच्छतेत शिक्षकांची भूमिका महत्त्वाची- शिवानंद टाकसाळे 

गणेश पांडे
Wednesday, 27 January 2021

शिक्षक यांनी गावच्या स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवून यापुढे गावातील एकही व्यक्ती उघड्यावर शौचास जाणार नाही यासाठी प्रयत्न करणार.

परभणी ः ग्रामीण भागामध्ये स्वच्छता आणि शिक्षणाची लोकचळवळ ऊभी करण्यासाठी जिल्ह्यातील शिक्षकांची भूमिका महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी सोमवारी (ता.25) केले.

बुधवारी (lता. २७) मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्यासह अधिकारी आणि महिला कर्मचाऱ्यांच्या गुड मॉर्निंग पथकाने मानवत तालुक्यातील ताडबोरगाव या ग्रामपंचायतीमध्ये सकाळी पाच वाजता भेट देऊन उघड्यावर शौचास जाणाऱ्या नागरिकांना शौचालयाचा नियमित वापर करण्याचे आवाहन केले. यावेळी गावातील शाळेचे मुख्याध्यापक अनिल सावळे आणि त्यांचे सहकारी शिक्षक यांनी गावच्या स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवून यापुढे गावातील एकही व्यक्ती उघड्यावर शौचास जाणार नाही यासाठी प्रयत्न करणार. तर विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देताना त्याच्याकडून शौचालयाचा नियमित वापर करत असल्याचा दाखला घेणार असल्याचे सावळे यांनी सांगितले. तसेच विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत व गाव विकासात अनिल सावळे यांचा सक्रिय सहभाग असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. डिजिटल शाळा, स्काऊट गाईडचे प्रशिक्षण, विद्यार्थ्यांतील शिस्त, शालेय स्वच्छता, परिसर स्वच्छता, लोकसहभागातून होत असलेले शाळेचे बांधकाम, प्लास्टिक मुक्तीची मोहिम हे सगळे उपक्रम मुख्याध्यापक अनिल सावळे यांनी राबविण्याचे नियोजन केले आहे.

हेही वाचामाहूरच्या रेणुका मंदीर विश्वस्तात व पुजेसाठी महिलांना स्थान द्यावे- तृप्ती देसाई

त्याच बरोबर गावच्या ग्रामसेविका मनीषा लोमटे, सीडीपीओ बी. टी. मुंढे, सुपरवायझर एम. एम. भोंग यांनी गावातील महिला व कर्मचाऱ्यांच्या मदतीने गाव स्वच्छतेसाठी व प्लास्टिक कचऱ्याचे नियोजन करण्यासाठी योग्य ती उपाय योजना करणार असल्याचे सांगितले. गावच्या विकासासाठी झटणार्‍या या कर्मचाऱ्या बद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी समाधान व्यक्त केले आणि जिल्ह्यातील इतर शिक्षक व कर्मचारी मंडळींनी देखील गाव स्वच्छतेत योगदान देण्याचे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी स्वच्छ भारत मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तूबाकले, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास घोडके, गट विकास अधिकारी सुनीता वानखेडे, गट शिक्षण अधिकारी संजय ससाने, विस्तार अधिकारी वसंत कांबळे, तुळशीराम राठोड, वसंत ईखे, सचिन पठाडे, शाळेचे शिक्षक बलभीम मातेले, अशोक गोरे, नरेंद्र कांबळे, स्वच्छ भारत मिशन कक्षातील अधिकारी, कर्मचारी, आशाताई अंगणवाडी ताई यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

 

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parbhani: The role of teachers is important in village cleanliness Shivanand Taksale parbhani news