esakal | परभणी : महिलांना आर्थिक स्वातंत्र्याचे दारे उघडणाऱ्या "सावित्रीच्या खऱ्या लेकी"
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

सोनपेठ तालुका तसा अतिशय दुर्गम समजला जातो. जिल्हा मुख्यालयातुन सोनपेठ ला पोहोचणे दुरापास्तच. शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळणे कठीण. त्यात महिलांना अशा योजनांची माहिती मिळणे मिळतच नाही.

परभणी : महिलांना आर्थिक स्वातंत्र्याचे दारे उघडणाऱ्या "सावित्रीच्या खऱ्या लेकी"

sakal_logo
By
कृष्णा पिंगळे

सोनपेठ ( जिल्हा परभणी ) : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी प्रतिकूल काळात शिक्षण घेऊन महिलांना शिक्षणाचे दारे उघडून मुख्य प्रवाहात आणले. त्याच सावित्रीबाईंच्या पावलावर पाऊल टाकून सोनपेठ तालुक्यातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्याची दारे खुल्या करणाऱ्या सावित्रीच्या खऱ्या लेकींची कहाणी. 

सोनपेठ तालुका तसा अतिशय दुर्गम समजला जातो. जिल्हा मुख्यालयातुन सोनपेठ ला पोहोचणे दुरापास्तच. शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळणे कठीण. त्यात महिलांना अशा योजनांची माहिती मिळणे मिळतच नाही. यातच महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मुस्लिम समाजातील सय्यद नसीम यांनी पुढाकार घेऊन तालुक्यात महिला बचत गटाची चळवळ सुरू केली. या चळवळीच्या माध्यमातून तालुक्यातील गावांमधून हजारो महिलांना एकत्र करून शेकडो महिला बचत गटाची स्थापना केली. 

हेही वाचा - परभणी : शिक्षण क्षेत्राला ऊर्जा देणार्‍या डॉ. सुचिता पाटेकर, आधूनिक सावित्रीची लेक

या महिला बचत गटातून समाजातील गरजू व होतकरू महिलांना अर्थसहाय्य उपलब्ध करून स्वतःच्या पायावर उभे करण्याचे काम त्यांनी केले आहे.अनेक महिलांना किराणा दुकान, पिठाच्या गिरण्या, पापड शेवया मशीन यासह शेळी पालन, कुक्कुटपालन यासारखे अनेक उद्योग उभे करण्यासाठी प्रशिक्षण देऊन महिलांची आर्थिक उन्नती साधण्याचा निरंतर प्रयत्न केला आहे. 

तालुक्यातील बहुतांश महिला ह्या शेतीशी निगडित असल्यामुळे त्यांनी या महिलांसाठी कृषी सेवा केंद्र स्थापन केले आहे. तसेच सोनपेठ तालुक्यात शंभर हेक्टर क्षेत्रफळावर टोमॅटो, मिर्ची व गोबी अशा प्रकारच्या भाजीपाल्याची ही लागवड केली आहे. यातून शेकडो महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. 

येथे क्लिक करानांदेड जिल्हा बँकेच्या निवडणुकीला अखेर मुहुर्त, सोमवारपासून प्रक्रिया -

ग्रामीण भागासह शहरी महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. या सर्व कामात त्यांच्यासोबत विजयमाला ठेंगे या दुसऱ्या सावित्रीच्या लेकीचाही महत्वपूर्ण सहकार्य मिळत आहे. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिला सक्षमीकरणात मोलाचा सहभाग घेऊन त्यांना आर्थिक स्वतंत्र मिळवून देणाऱ्या सय्यद नसीमा व विजयमाला ठेंगे या सावित्रीच्या लेकींचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image
go to top