परभणीत राज्य सरकारी कर्मचारी संपावर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनेने मंगळवारी राज्यव्यापी संपाची हाक दिली आहे. त्यामध्ये परभणी जिल्ह्यातील सर्वच विभागाचे कर्मचारी सहभागी झाले आहेत. विविध विभागातील कर्मचारी संघटनेने एकत्रित येत या संपात सहभाग घेत आप-आपल्या कार्यालयासमोर निदर्शने केली आहेत.

परभणी : विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील राज्य सरकारी कर्मचारी मंगळवारी (ता.7) एकदिवसीय संपावर गेल्याने जिल्हा परिषद, महसुल प्रशासन, आरोग्य विभाग, बांधकाम विभागातील कामकाज ठप्प झाले आहे.जिल्हा परिषदेसमोर कर्मचाऱ्यांनी निर्दशने करीत रोष व्यक्त केला आहे.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनेने मंगळवारी राज्यव्यापी संपाची हाक दिली आहे. त्यामध्ये परभणी जिल्ह्यातील सर्वच विभागाचे कर्मचारी सहभागी झाले आहेत. विविध विभागातील कर्मचारी संघटनेने एकत्रित येत या संपात सहभाग घेत आप-आपल्या कार्यालयासमोर निदर्शने केली आहेत. जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, सार्वजनीक बांधकाम विभाग, कृषि विभाग 

यांसह तालुक्यावरील तहसिल, पंचायत समितीसह अन्य कार्यालयात कामकाज ठप्प झाले आहे.सातव्या वेतनाचा लाभ जानेवारी 2016 पासून देण्याच्या प्रमुख मागणीसह एकूण 20 मागण्यांसाठी हा संप केला जात आहे. या संपामुळे मंगळवारी सर्वच शासकीय कार्यालयात रिकाम्या खुर्च्या पाहायला मिळाल्या असून कामे मात्र खोळंबली आहेत.या संपात महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी संघ देखील सहभागी झाला आहे.

Web Title: Parbhani State Employee On strike