परभणीवर सूर्य कोपला; तापमान ४६ अंशावर

file photo
file photo

परभणी : परभणीत उष्णतेच्या लाटेने कहर केला असून सोमवारी (ता.२५) यंदाच्या आतापर्यंतच्या तापमानाचा उच्चांक गाठला गेला आहे. आग ओकणारे सुर्यप्रकाशाने परभणीकर हैरान झाले असून सोमवारी पारा तब्बल ४६ अंशावर पोचला आहे. नांदेड ४५, हिंगोली ३८ अंशावर तापमान होते.

यंदा उशिराने एप्रिलमध्ये दुसऱ्या आठवड्यापासून परभणी तापली आहे. अख्खा एप्रिल महिन्यात तापमान ४० अंशाच्या पुढे राहीले होते. मे महिन्यात सुरुवातीला पारा ४३ अंशाच्या पुढे गेला होता. मध्यंतरी चार दिवस ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस यामुळे तापमान काहीसे घसरले होते. परंतु पुन्हा मागील आठवड्यापपासून पारा वाढला आहे. सोमवारी येथील भारतीय हवामान खात्याच्या केंद्रात ४६ अंश तापमानाची नोंद झाली आहे. दररोज सकाळी १० वाजल्यापासून उन्हाचे चटके सुरु होत आहेत. भर दुपारी भयंकर उन्हाचा कडाका राहत असून  जाळ फेकल्यासारखी स्थिती निर्माण होत आहे. भर उन्हात सावली बाहेर पडणे कठीण झाले असून सायंकाळी सहा वाजेपर्यंत उन्हाच्या झळा बसत आहेत. मे महिण्यात परभणीचे तापमान ४५ ते ४६ अंशावर जाते. गतवर्षी सलग दोन महिने तापमान ४५ अंशाच्या पुढे होते.

३८ पोलिस कर्मचारी क्वारंटाइन
परभणी : परभणी जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांतर्गत कार्यरत असणाऱ्या ३८ पोलिस कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. या ३८ कर्मचाऱ्यांचा स्वॅब अहवाल प्राप्त होईपर्यंत त्यांना कोणाच्याही संपर्कात न येण्याचे आदेश पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने देण्यात आले आहेत.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांतर्गत काम करणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नुकतीच आरोग्य शिबिराच्या माध्यमातून तपासणी करण्यात आली होती. त्या तपासणीत त्यांचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. परंतु, या स्वॅबचा अहवाल अद्यापही प्राप्त झालेला नाही. त्यामुळे या स्वॅबचा अहवाल प्राप्त होणार नाही तोपर्यंत या ३८ पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना इन्ट्युट्युशनल क्वारंटाइन करावे. त्यांना कुणाच्या ही संपर्कात येऊ नये, असे आदेश पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने सोमवारी (ता. २५) पत्रकाद्वारे काढण्यात आले आहेत.

हेही वाचा...

घराला आग लागल्याने लाखाचे नुकसान...
सेलू (जि.परभणी) : म्हाळसापूर (ता. सेलू) गावातील अशोक बाबूराव आवटे यांच्या घरासह जनावरांच्या गोठ्याला सोमवारी (ता. २५) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आग लागून सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
म्हाळसापूर (ता. सेलू) येथील अशोक आवटे यांच्या राहत्या घरी सोमवारी ते शेतात गेले असताना अचानक आग लागली. घराला आग लागल्याचे कळताच ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केला. सेलू नगरपालिकेची अग्निशमन दलाची गाडी दाखल झाल्यानंतर संपूर्ण आग दुपारी तीन वाजता आटोक्यात आली. घटनास्थळी गावचे सरपंच कमलाकर आवटे, पोलिस पाटील पांडुरंग सोळंके यांनी भेट दिली. या आगीत जवळपास आठशे कडबा, घरावरील पत्रे, ठिबक सिंचन साहित्य व इतर साहित्य मिळून जवळपास लाख रुपयांचे नुकसान झाले. दोन महिन्यांपासून कोरोनाच्या दहशतीने खचलेल्या आवटे यांच्या कुटुंबावर आगीच्या या घटनेमुळे झालेल्या आर्थिक हानीमुळे मोठे संकट निर्माण झाले आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com