esakal | परभणी : आजची तरुणाई आणि येणार्‍या नवीन वर्षाचा जल्लोष...
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

इंग्रजी नव वर्षाची सुरवात होणार आहे. त्याची चाहूल 'नाताळ' या ख्रिस्ती सणापासूनच लागलेली असते. प्रत्येकांचे नविन वर्षाचे वेगवेगळे नियोजन ठरलेले असते. कोणी दरवर्षी प्रमाणे ठरलेले संकल्प करतो.

परभणी : आजची तरुणाई आणि येणार्‍या नवीन वर्षाचा जल्लोष...

sakal_logo
By
विलास शिंदे

सेलू ((जिल्हा परभणी) : खरंतर आपण सर्वजण विविधतेने नटलेल्या महाराष्ट्रात राहतो. त्यामुळे पाश्चात्य देशाप्रमाणे इंग्रजी नवं वर्षाचे स्वागत आपण न करता गुढीपाडवा या आपल्या नव वर्षाचे जल्लोषात स्वागत करायला हवे.असे मत येथिल मोरया प्रतिष्ठाणचे अध्यक्ष अभिजित राजूरकर यांनी सन-२०२१ या नविन वर्षाच्या अगमनानिमित्त व्यक्त केल.

इंग्रजी नव वर्षाची सुरवात होणार आहे. त्याची चाहूल 'नाताळ' या ख्रिस्ती सणापासूनच लागलेली असते. प्रत्येकांचे नविन वर्षाचे वेगवेगळे नियोजन ठरलेले असते. कोणी दरवर्षी प्रमाणे ठरलेले संकल्प करतो.तर कोणी वर्षाचे आर्थिक गणित मांडत बसतो. मात्र तरुणाई म्हणाल तर त्यांचे नियोजन कायम ठरलेलं असतं ते म्हणजे नविन वर्ष सुरू होतांना दणक्यात आणि बिनधास्त त्याच स्वागत करायचं ते पण पटेल तस. आता काळ बदलत चालला आहे. त्या प्रमाणे नववर्ष, आनंद, उत्सव, सण, डे आदी एकत्र येण्यासाठी आपल्याला निमित्त शोधावं लागत आहे.या आधिच्या पिढी सारखे निमित्त नसतांना सुद्धा भेटणे एकमेकांची खुशाली वाटून घेणे,सुख दुःखात सहभागी होणे, एकमेकांचा आदर करणे आता दुरापस्त झालेले आहे.

हेही वाचापरभणी : सोन्याचे आमिष दाखवून लाखो रुपये लुटणाऱ्या आरोपींना सेलू पोलिसांनी ठोकल्या बेड्या

त्यामुळे आजची तरुण पिढी बदललेली प्रकर्षाने जाणवतं आहे. सध्याच्या तरुणाई मध्ये ध्येय चिकाटी, महत्वकांक्षा, स्पर्धा प्रचंड प्रमाणात आहे. मात्र त्यासोबतच तणाव, ईर्ष्या, व्यसनाधिनता, अहंकार, अविश्वास आदी बाबींमुळे तरूण पिढी ग्रासली आहे. म्हणूनच कोणतेही सुख दुःखाचे प्रसंग आले की, त्याला सामोरे जातांना व्यसन करणे प्राथमिकता झालेली आहे. मग ती नवीन वर्षाची सुरवात का असेना.अनेक ठिकाणी नवीन वर्षाचे स्वागत करतांना वेगवेगळे धार्मिक,आध्यत्मिक, कौटुंबिक उपक्रम होत असतात. त्याकडे आजची तरुणाई कानाडोळा करते.निर्धास्त होवून डिजेच्या तालावर ठेका धरत, हातात काचेचा भरलेला ग्लास घेत थिरकण्यात जी मजा असते ना ती कशातच मिळत नाही.

हे तरुणाईचे नव वर्षाचे स्वागत करतांना इतरांना देण्यासाठी ठरलेलं उत्तर.कोणाला आनंद कशात मिळेल सांगता येत नाही. म्हणून वेगवेगळे फंडे नव वर्षाचे स्वागत करतांना दिसून येतात. नवं वर्षच काय प्रत्येक सण,उत्सव तरुणाईने संघटित होवून जल्लोषात साजरा करावा. यात कोणाचेही दुमत असणार नाही. परंतू हे साजरे करतांना जबाबदारी, संस्कार याचे विस्मरण होता कामा नये. आपण नविन वर्ष गुढी पाडव्यालाच मानायला हवे घरातील कॅलेंडर बदलले म्हणून आपले संस्कार,आपले वेगळेपण आपण विसरता कामा नये.असे मत मोरया प्रतिष्ठाणचे अध्यक्ष अभिजित राजूरकर यांनी 'सकाळ' बोलतांना व्यक्त केल.

संपादन - प्रल्हाद कांबळे