esakal | Parbhani: ‘कवच कुंडल’चे शेवटचे दोन दिवस
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हाधिकारी

परभणी : ‘कवच कुंडल’चे शेवटचे दोन दिवस

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

परभणी : जिल्ह्यात कोरोनाची दूसरी लाट कमी होत असली तरी जिल्हा प्रशासन सजग असून कोरोना हद्दपार होऊन संभाव्य तिसरी लाट येऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. कोरोनाला पूर्णत: हद्दपार करण्यासाठी जिल्ह्यात ता. ८ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत ‘मिशन कवच कुंडल’ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेतंर्गत जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले आहे.

जिल्हा प्रशासनाकडून कोरोनाचा प्रादुर्भाव पुर्णत: रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असून या उपाययोजना यशस्वी देखील होत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी संभाव्य तिसरी लाट येऊ नये याकरीता सर्वांनी लसीकरण करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी ता. ८ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत ‘मिशन कवच कुंडल’ ही विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेस जिल्ह्यातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, अनेक नागरिकांनी लसीकरण करून घेतले आहे.

हेही वाचा: बाधितांंना मरणानंतरही छळले ः मसणवट्यावरून राजकारण पेटले

परंतू घरकाम किंवा कुटूंबाच्या जबाबदारीमुळे कुटुंबातील प्रमुख गृहिणी या लसीकरणांपासून वंचित राहत असल्याचे निदर्शनास येत आहे. याकरीता कुटुंब प्रमुखांनी कुटुंबातील सर्व सदस्यांसोबत गृहीणींचे देखील लसीकरण होईल व त्या सर्व सुरक्षित होतील याची दक्षता घ्यावी.

काही दिवसांपासून जिल्ह्यातील काही भागात कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे. जिल्ह्यातील सर्व नगरपालिका क्षेत्रात लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी ८ ऑक्टोबरपासून विशेष लसीकरण मोहिमेअंतर्गत राबविण्यात येत असून यासाठी सर्व नगरपालिकेअंतर्गत प्रभागनिहाय लसीकरण केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. लसीकरण केंद्रावर लोकांना मदत करण्यासाठी तसेच लोकांना लसीकरण केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी नगरपालिका कर्मचारी व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची संयुक्त पथके स्थापन करण्यात आली आहेत.

यात लसीकरणासाठी लोकप्रतिनिधी, नगराध्यक्ष व नगरसेवकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असणार आहे. तरी ‘मिशन कवच कुंडल’ लसीकरण अभियानाअंतर्गत नागरी भागातील सर्व नागरिकांनी आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे लसीकरण करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले आहे.

loading image
go to top