
सेलू शहरालगत पाथरी रस्त्यावर रेल्वे गेट क्रमांक ९९ वरिल रेल्वे क्राॅसिंग पुलाचे काम गेल्या दिड वर्षापासून रखडले असून सेलू—पाथरी रस्त्यावरही खड्डेच खड्डे झाले असल्याने वाहन धारकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
सेलू (जिल्हा परभणी) - महाराष्र्ट रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड,महाराष्र्ट सरकार व रेल्वे मंत्रालय यांच्या वतिने होत असलेल्या सेलू शहरालगत पाथरी रस्त्यावर रेल्वे गेट क्रमांक ९९ वरिल रेल्वे क्राॅसिंग पुलाचे काम गेल्या दिड वर्षापासून रखडले असून सेलू—पाथरी रस्त्यावरही खड्डेच खड्डे झाले असल्याने वाहन धारकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
साईबाबा यांची जन्मभूमी पाथरी व सदगुरू बाबासाहेब महाराज यांची भुमी सेलू या २४ किलोमिटर अंतराचा रस्ता मागील अनेक वर्षापासून खड्डेमय झाला आहे.संबधित विभागाकडून प्रत्येक वर्षी या रस्त्यावरिल खड्डे बुजविण्यासाठी शासनाचा कोट्यावधी रूपयांचा खर्च होत आहे. तरी देखील या रस्त्यावरिल खड्डे कामयच आहेत अशी परिस्थिती आहे.अनेक वर्षे पाथरीवरून येणारे वाहण चालक पाथरीवरून मानवत रोड मार्गे ये—जा करीत आहेत.राज्य रस्ता क्रमांक २२१ सेलू ते पाथरी रस्ता हा राष्र्टीय महामार्ग यांच्याकडे वर्ग झाला आहे.याला राष्र्टीय महामार्ग '५४८ बी' हा क्रमांक मिळाला आहे.देवगाव ( फाटा ) ते सेलू —पाथरी मार्गे लिंबा—विटा—सोनपेट—इंजेगाव—परळी अशा ९८ किलोमिटरचा दर्जा मिळाला आहे.यंदाच्या पावसाळ्यापूर्वी सहा कोटी रूपये खर्च करून सेलू—पाथरी रस्त्याचे डांबरीकरण व नूतनीकरण करण्यात येणार होते.तसेच मागील अनेक वर्षापासून सतत मागणी होत असलेल्या सेलूहून पाथरीकडे जाणार्या रेल्वे क्राॅसिंगवरिल उड्डाण पूलाचे काम देखील दिड वर्षात पूर्ण होणार होते.परंतू (ता.२७) आॅगस्ट —२०१९ ला लांबी ३७६,१०५ मीटर,कालावधी ३६० दिवस अशा लावलेला फलक अद्यापर्यंत कायमच आहे.त्या ठिकाणी संबंधित एजन्सीने केवळ खोदकाम करून लोंखडी पत्राचे ले—आऊट लावूण वाहन धारकांना अडचण निर्माण केली आहे.
हेही वाचा - मुदखेड येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस अभिवादन -
खड्यांनी अनेकांच्या झाले फॅक्चर...
मार्च महिण्यात राज्यात आलेल्या महाभयंकर 'कोरोना' या रोगामुळे नागरिकांना घरिच बसून राहावे लागले.या काळात दवाखाण्यात अथवा महत्वाच्या इतर कामासाठी नागरिकांना सेलू ते पाथरी रस्त्याने ये—जा करावी लागली.परंतु या रस्त्यावरिल खड्यांमुळे अनेकांना मणकांचा त्रास तर अनेकांच्या हाता,पायांना फॅक्चर करण्याची वेळ या खड्डेमय रस्त्यामूळे झाली आहे.
संपादन- प्रल्हाद कांबळे