esakal | परभणीकरांनो प्राणवायुसाठी आता 'नो टेन्शन'

बोलून बातमी शोधा

oxygen
परभणीकरांनो प्राणवायुसाठी आता 'नो टेन्शन'
sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी ः गेल्या काही दिवसापासून ऑक्सीजनची कमतरता भासत असल्याने परभणीकरांसमोर संकट उभे राहिले होते. परंतू आता हे संकट काही अंशी टळले आहे. कारण चाकण (पुणे) येथून दररोज एक टॅकर ऑक्सीजन उपलब्ध होणार आहे. त्याच बरोबर जिल्हा परिषद कोविड सेंटरमधीलही ऑक्सीजन प्लॅन्ट चार दिवसात कार्यान्वीत होईल त्यानंतर परभणीतील रुग्णांना ऑक्सीजनची कमतरता पडणार नसल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे.

परभणी जिल्ह्याची दररोजची ऑक्सीजनची आवश्यकता 17 टन एवढी आहे. त्यामुळे ऑक्सीजनबाबत आता कसलीही चिंता उरलेली नाही. जिल्ह्यात ऑक्सिजनचा झालेला तुटवडा, अन्य जिल्ह्यांनी केलेली पळवापळवी या पार्श्वभूमीवर चाकण, बेल्लारी, राजेश्वरी या तिन्ही ठिकाणावरून ऑक्सिजनचे टँकर येथे पोहोचल्याने आता पुरेश्या प्रमाणात ऑक्सीजनचा साठा जिल्ह्यात उपलब्ध होत आहे. त्यामुळे सध्या तरी परभणीकारांना ऑक्सीजनबाबत परभणीकर चिंता करण्याचे कारण नाही. गेल्या काही दिवसात ऑक्सीजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत होता. शनिवारी (ता. 24) रात्री उशिरा चाकणवरून 18 'केएल', बेल्लारीवरून 18 'केएल' आणि राजेश्वरी (हैदराबाद) येथून 14 'केएल' असा ऑक्सिजन साठा उपलब्ध झाला आहे. या तिन्ही

हेही वाचा - जिंतूर शिवारात दुसऱ्यांदा आढळला 'स्वर्गीय नर्तक' पक्षी

ठिकाणावरून टँकरद्वारे तो आलेला आहे. ऑक्सीजनच्या वाहतुकीबाबत जिल्हा प्रशासनाने पुरेशी खबरदारी बाळगली आहे. त्यामुळे पुरेश्या प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध झाला आहे.

ऑक्सीजन प्लॅन्टचे महाराष्ट्र दिनी उद्घाटन

येथील जिल्हा परिषद कोविड सेंटरच्या आवारात बसविण्यात येत असलेल्या ऑक्सीजन प्लॅन्टचे उदघाटन ता. 1 मे रोजी पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते होणार आहे. परळी येथील औष्णिक वीज केंद्रातील ऑक्सीजन प्लांटची यंत्रणा गेल्या आठवड्यात परभणीतील जिल्हा परिषद इमारत परिसरात दाखल झाली आहे. प्रति तास पन्नास हजार लिटर ऑक्सिजनची क्षमता या यंत्रणेची असून 10 'केएल'च्या या दोन टाक्या आहेत. त्याद्वारे 24 तास ऑक्सीजन निर्मिती होणार आहे. सहाशे मोठे सिलेंडर रोज निर्माण होतील अशी या यंत्रणेची क्षमता आहे. महाराष्ट्रदिनी शनिवारी (ता. एक) पालकमंत्री नवाब मलिक यांच्याहस्ते उद्घाटन होऊन ही यंत्रणा कार्यान्वित होणार आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे