इंदिरा मॅरेथॉनमध्ये परभणीच्या ज्योती गवतेला विक्रमी विजेतेपद

इंदिरा मॅरेथॉनमध्ये परभणीच्या ज्योती गवतेला विक्रमी विजेतेपद

परभणी : अलहाबाद (प्रयागराज) येथे सोमवारी (ता.20) झालेल्या इंदिरा मॅरेथॉन स्पर्धेत परभणीची सुवर्णकन्या ज्योती गवतेने सलग सहावे व विक्रमी विजेतेपद पटकावले. 
अलहाबाद येथे अखिल भारतीय प्राईजमनी इंदिरा मॅरेथॉन स्पर्धेचे हे 34 वे वर्ष होते. या स्पर्धेत देशभरातील नामांकीत धावपटू सहभागी होतात. 

सोमवारी सकाळी आनंद भवन येथून सुरु झालेल्या महिला गटाच्या मॅरेथॉन स्पर्धेत परभणीच्या ज्योती शंकराव गवते या आंतरराष्ट्रीय धावपटून दोन तास 52 मिनिटे 58 सेकंदाची वेळ नोंदवून स्पर्धेचे विक्रमी विजेतेपद पटकावले. ज्योतीने सलग सहावे विजेतेपद पटकावून डबल हॅट्ट्रिक साधली. या स्पर्धेत नामांकीत धावपटू शामली सिंह व राणी यादव यांना तिने पुन्हा एकदा पिछाडीवर टाकले. 

साई इंटरनॅशनल स्पोर्टस् अॅकॅडमीचे संस्थापक व प्रशिक्षक रवि रासकटला यांच्या मार्गदर्शनाखाली ज्योती सराव करते. नुकतेच तिने केनिया येथे जाऊन तीन महिने प्रशिक्षण घेतले. त्यासाठी खासदार संजय जाधव यांनी तिला तीन लाखाची मदत केली होती. तेथून परतल्यानंतर ज्योती पहिल्याच मोठ्या स्पर्धेत सहभागी झाली होती. तिथे तिने पुन्हा एकदा आपल्यातील गुणवत्तेची चुणूक दाखवून विक्रमी विजेतेपदाला गवसणी घातली. या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

ज्योतीला आता ऑलिम्पिकचे वेध

गेल्या सात ते आठ वर्षांपासून शासनाच्या, राज्य अॅथलेटिक्स संघटना, अॅथलेटिक्स महासंघाच्या कुठल्याही प्रकाराच्या सहकार्याशिवाय ज्योती अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मॅरेथान स्पर्धा गाजवत आहे.

मुंबई, पुणे येथील मॅरेथॉनसह तीने देशभरातील नामांकीत स्पर्धेत विजेतेपदाला गवसणी घातली आहे. आता तिला ऑलिम्पिक स्पर्धेचे वेध लागले असून पात्रता स्पर्धेतून पात्र ठरण्यासाठी ती कसोसीने प्रयत्न करीत आहे. केनिया येथील प्रशिक्षणानंतर ती शहरातील कृषी विद्यापीठ व मांडाखळी येथील इंद्रायणी माळावर धावण्याचा सराव करीत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com