परभणीची ‘ज्योती’ दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत चमकणार

ज्योती गवते
ज्योती गवते

परभणी : परभणीची आंतरराष्ट्रीय धावपटू ज्योती गवतेची नेपाळ येथे होणाऱ्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली असून रविवारी (ता.एक) भारतीय संघासोबत रवाना झाली आहे.
 
नेपाळ येथे ता.एक ते १० डिसेंबर दरम्यान १३ व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये आठ देश सहभागी होणार आहे. बांगला देश, श्रीलंका, भारत, पाकीस्तान, नेपाळ, अफगाणीस्तान, भूतान, मालदिव या आठ देशाचे खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. 


दिल्ली येथे फेब्रुवारी २०१९ मध्ये झालेल्या आयडीबीआय मॅरेथॉन स्पर्धेत दोन तास ४७ मिनीटांची वेळ देत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. तिची हिच कामगिरी आशियाई क्रीडा स्पर्धेच्या निवडीस कारणीभूत ठरली आहे. भारतीय मॅरेथॉन संघात ज्योतीसह लेह-लद्दाखच्या जिग्मेट डोलमा हिचा देखील समावेश आहे. सन २०१६ मध्ये गोहत्ती (भारत) येथे झालेल्या दक्षिण आशियाई स्पर्धेत ज्योतीने मॅरेथॉन स्पर्धेत चौथे स्थान प्राप्त केले होते. या वेळी मात्र, तिला पदकाची खात्री आहे. तसेच ही स्पर्धा तिला ऑलिम्पिक स्पर्धेचे दरवाजा उघडते का? हे ही दिसून येणार आहे. 

ऑलिम्पिक पात्रतेसाठी कसोसिचे प्रयत्न
शासनाकडून कुठल्याही सोयीसुविधा अद्यापही ज्योतीला मिळाल्या नाहीत. परंतु, गेल्या काही वर्षापासून ती अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊन उत्कृष्ट कामगिरी बजावत आहे. डिसेंबर २०१८ मध्ये चीनमध्ये कुनमिंग येथील आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत ज्योतीने भारताचे प्रतिनिधीत्व करून नववे स्थान प्राप्त केले होते. तर मार्च २०१९ मधअये तैपेई येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत ज्योतीने आठवे स्थान प्राप्त केले आहे.  

‘ज्योती ’ला पात्रतेसाठी तीन स्पर्धा
ज्योती व तिचे प्रशिक्षक रवि रासकटला यांनी ऑलिम्पिक पात्रतेसाठी आगामी तीन स्पर्धांवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामध्ये नेपाळ येथील दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा, मुंबई येथे जानेवारी २०२० मध्ये होणारी मॅरेथॉन स्पर्धा व दिल्ली येथे मे २०२० मध्ये होणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धेवर लक्ष केंद्रीत केले आहे. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com