हुंड्यासाठी एसटी वाहक महिलेचा छळ; सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल

प्रल्हाद कांबळे
रविवार, 19 ऑगस्ट 2018

वंदना शिंदे (वय २८) यांचे लग्न हाळदा ता. कंधार येथील सुधाकर शिंदे याच्यासोबत झाले होते. लग्नानंतर काही दिवस त्यांना चांगले नांदवले. परंतु सन २०१७ पासून ते १४ आॅगस्ट पर्यंत माहेराहून दोन लाख रुपये आणण्याची सतत मागणी करु लागले.

नांदेड : माहेराहून दोन लाख रुपयांची मागणी करून सतत मानसिक व शारिरीक छळ करणाऱ्या सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीत महिला ही एसटी महामंडळात वाहक या पदावर आहे. 

बिलोली आगारात वाहक म्हणून कार्यरत असलेल्या वंदना शिंदे (वय २८) यांचे लग्न हाळदा ता. कंधार येथील सुधाकर शिंदे याच्यासोबत झाले होते. लग्नानंतर काही दिवस त्यांना चांगले नांदवले. परंतु सन २०१७ पासून ते १४ आॅगस्ट पर्यंत माहेराहून दोन लाख रुपये आणण्याची सतत मागणी करु लागले. पैशाची पुर्तता झाली नाही तर तिला शिविगाळ करून मारहाण करुन शारिरीक व मानसिक छळ करून त्रासून सोडत असत. पतीला नोकरी लावायची आहे म्हणून या रक्कमेची सत मागणी करु लागले. पैशाची पुर्तता नाही केली तर ठार मारण्याची धमकी दिली. या सतत होणाऱ्या छळाला कंटाळून पिडीत महिला वाहक वंदना शिंदे यांनी बिलोली पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यावरून पोलिसांनी नवरा सुधाकर शिंदे, सासु अहिल्याबाई शिंदे, सासरा माधव शिंदे, भाया प्रताप शिंदे, जाऊ प्रतिभा शिंदे, दीर हनमंत शिंदे आणि ननंद शालीनी गायकवाड यांच्याविरूध्द विवाहितेचा छळ, मारहाण, शिविगाळ यासह आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस हवालदार श्री. वाघमारे हे करीत आहेत.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Parent in laws persecuted a woman for Dowry

टॅग्स