कुत्रा पाळण्यावरून पालक रागावले; विद्यार्थ्याने घेतला गळफास

योगेश पायघन
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

घरात कुत्रा पाळण्याचा हट्ट धरलेल्या 11 वर्षीय मुलाला आई-वडिलांनी रागावले. त्याचा राग आल्याने मुलाने गळफास घेतला. ही घटना शनिवारी (ता. दहा) दुपारी तीनच्या सुमारास रामनगरातील प्रकाशनगर येथे घडली. सर्वेश रणजितकुमार साह असे मृताचे नाव आहे.

औरंगाबाद - घरात कुत्रा पाळण्याचा हट्ट धरलेल्या 11 वर्षीय मुलाला आई-वडिलांनी रागावले. त्याचा राग आल्याने मुलाने गळफास घेतला. ही घटना शनिवारी (ता. दहा) दुपारी तीनच्या सुमारास रामनगरातील प्रकाशनगर येथे घडली. सर्वेश रणजितकुमार साह असे मृताचे नाव आहे.

नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, एका खासगी संस्थेत काम करणारे रणजितकुमार साह रामनगर परिसरातील प्रकाशनगरात पत्नी, दोन मुले व एका मुलीसह राहतात. त्यांचा मुलगा सर्वेश सिडको एन 1 येथील सेंट झेव्हीयर शाळेत सातवीत शिकत होता. गेल्या आठवड्यापासून घरी कुत्रा पाळण्याचा त्याने हट्ट धरला होता. गल्लीतील एक कुत्रा पकडून त्याने तो घरीही आणला होता; मात्र तो कुत्रा घाण करीत असल्याने आईवडिलांचा त्याला विरोध होता. दरम्यान, आई-वडिलांनी त्याचे समुपदेशनही केले होते. त्यानुसार, पावसाळा संपल्यावर कुत्रा घरी पाळण्यासाठी आणण्याचे आश्‍वासन दिले; मात्र तो ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता.

त्यामुळे वडिलांनी गल्लीतील ते कुत्र्याचे पिल्लू पकडून आणूनही दिले होते. शनिवारी तो नेहमीप्रमाणे शाळेत गेला. शाळेतून घरी आल्यावर तो कुत्र्यासोबत खेळण्यावरून त्याला आईने रागावले. कुत्र्याला हाकलून लावले. त्याचा राग त्याने मनात धरून त्याने स्वतःला कोंडून घेतले. पंधरावीस मिनिटाहून अधिक कालावधी झाल्या तरी तो दरवाजा उघडत नसल्याने आईने शेजारांच्या मतदीने घराच्या वरीला पत्रा उचकडून घर उघडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सर्वेशने बेडशीटच्या साह्याने छताच्या एंगलला गळफास घेतल्याचे समोर आले. शेजाऱ्यांनी त्याला शेजारच्या खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्‍टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याला घाटीत उत्तरीय तपासणीसाठी दाखल करण्यात आले असून, या घटनेची नोंद मुकुंदवाडी पोलिसांत करण्यात आली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PARENTS REFUSE TO HAVE A PET : STUDENT COMMITS SUICIDE