पालकांनी मुलांची दुसऱ्याशी तुलना बंद करा 

औरंगाबाद ः "सकाळ माध्यम समूह' आणि ज्ञानेश विद्यामंदिरतर्फे मंगळवारी पालक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मानसोपचारतज्ज्ञ डॉ. संदीप शिसोदे.
औरंगाबाद ः "सकाळ माध्यम समूह' आणि ज्ञानेश विद्यामंदिरतर्फे मंगळवारी पालक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मानसोपचारतज्ज्ञ डॉ. संदीप शिसोदे.

औरंगाबाद - "दुसऱ्याशी तुलना केल्याने मुलांचा अहंकार दुखावला जातो. पालकांनी विद्यार्थ्यांची एकमेकांशी तुलना न करता त्याची स्वतःशीच तुलना करावी,' असा सल्ला मानसोपचारतज्ज्ञ डॉ. संदीप शिसोदे यांनी पालकांना दिला. 


'सकाळ माध्यम समूह' आणि ज्ञानेश विद्या मंदिरतर्फे मंगळवारी (ता.29) पालक विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर 'अभ्यासाची तयारी' कार्यशाळा घेण्यात आली. ठाकरेनगर येथील ज्ञानेश विद्या मंदिर व हेरंब प्राथमिक शाळेच्या प्रांगणात झालेल्या या कार्यशाळेला सुमारे सहाशे विद्यार्थी आणि दोनशे पालकांची उपस्थिती होती. व्यासपीठावर शैलेश विटोरे, मुख्याध्यापक रामनाथ पंडुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. 
मानसोपचारतज्ज्ञ डॉ. संदीप शिसोदे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मानसशास्त्र विभागप्रमुख डॉ. अपर्णा अष्टपुत्रे यांनी संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्‍नांना त्यांनी उत्तरे दिली. तसेच पालकांनीही शंकांचे निरसण करून घेतले. 
 
पालकांसाठी... 
  

  • मुलांचे कौतुक करा, चांगल्या कृतीला प्रतिसाद द्या 
  • मुलांना अभ्यासाची जाणीव करून द्या 
  • बाहेरचे, उघड्यावरचे पदार्थ खाऊ देऊ नका 
  • मुलांना वारंवार सूचना देणे बंद करा 
  • सतत चौकशा करण्यापेक्षा मुलांशी गप्पा मारा 

 
विद्यार्थ्यांसाठी... 

  • आपल्या पंचज्ञानेंद्रियांचा वापर अभ्यासासाठी करा 
  • टीव्ही, सोशल मीडियापासून दूर रहा; मैदानी खेळ खेळा 
  • जंकफूड घेऊ नका; घरातील सकस आहार घ्या 
  • अभ्यासाचे वेळापत्रक तयार करा; ध्येय डोळ्यांसमोर ठेवा 
  • अभ्यासाच्या नोट्‌स काढून ठेवा; त्याचे रिव्हिजन करा. 

 
 
मुलांच्या अभ्यासाबाबत अनेक पालक शाळेत शिक्षकांना जाब विचारत आसतात. अभ्यासासाठी पालकांनी विद्यार्थ्यांशी कशाप्रकारे संवाद साधावा, हे या कार्यशाळेतून पालकांना समजले. दोन्ही तज्ज्ञांनी खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले. त्याबद्दल "सकाळ' व तज्ज्ञांचे आभार. 
- रामनाथ पंडुरे, मुख्याध्यापक, ज्ञानेश विद्यामंदिर  
 
आम्हाला जे प्रश्‍न पडतात, त्यावरच तज्ज्ञांनी अगदी मौलिक शब्दांत मार्गदर्शन केले आहे. या कार्यशाळेमुळे मुलांशी कसे वागावे, हे लक्षात आले आहे. "सकाळ'च्या या उपक्रमाचे खूप धन्यवाद. 
- सोनाली गिरगे, पालक  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com