परळीच्या विद्यार्थ्याची "स्मार्ट सिटी'ची संकल्पना तमिळनाडू सरकारने स्वीकारली

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जानेवारी 2017

परळी वैजनाथ - येथील ऊर्जानगर वसाहतीतील राहुल सूर्यकांत साखरे या चेन्नई येथे "आयआयटी'त शिकणाऱ्या विद्यार्थ्याची "स्मार्ट सिटी' प्रकल्पाची संकल्पना तमिळनाडू सरकारने स्वीकारली असून त्याने तयार केलेल्या "व्हॅक्‍युम कॉउंटिंग इन्स्ट्रूमेन्टस्‌' या उपकरणाच्या डिझाईनबद्‌दल त्याचा देशपातळीवरील सुवर्णपदक देऊन गौरव झाला आहे.

राहुल साखरे हा येथील ऊर्जानगर वसाहतीतील न्यू हायस्कूल शाळेचा माजी विद्यार्थी आहे. सध्या तो चेन्नई (मद्रास) येथे बी.टेक.च्या शेवटच्या वर्षात शिकत आहे. हे शिक्षण घेत असताना अमेरिका, थायलंड येथे त्याने विविध प्रकल्पांवर काम करून आपल्या गुणवत्तेची छाप टाकली आहे. त्याने तयार केलेल्या "स्मार्ट सिटी' प्रकल्पाची संकल्पना तमिळनाडू सरकारने स्वीकारली आहे. त्याचबरोबर डिझाईनच्या नॅशनल डिझाईन ऍण्ड रिसर्च फोरम (एनडीआरएफ) या संस्थेने राहुल साखरे याने बनवलेल्या "व्हॅक्‍युम कॉउंटिंग इन्स्ट्रूमेन्टस्‌' या उपकरणाच्या डिझाईनबद्‌दल त्याचा सुवर्णपदक देऊन देशपातळीवर गौरव केला आहे. बाजारात या उपकरणाची किंमत दोन लाख रुपये आहे; परंतु राहुल साखरे याने बनवलेल्या उपकरणाची केवळ वीस हजार रुपये असणार आहे. या यशाबद्‌दल न्यू हायस्कूल शाळेत त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी वीज केंद्राचे कल्याण अधिकारी एस. पी. वासुदेव, मुख्याध्यापक डी. डी. वाघमारे, एम. एल. कोदरकर, पर्यवेक्षक एम. एस. चव्हाण यांच्यासह शाळेतील शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. राहुल साखरे याचे औष्णिक वीजनिर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता एल. बी. चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी कौतुक केले आहे.

Web Title: Parli the student "Smart City's concept is accepted by the government of Tamil Nadu