esakal | पारनेर गावकर्‍यांचा बैलपोळा सण होणार अंधारात साजरा
sakal

बोलून बातमी शोधा

bailpola

पारनेर गावकर्‍यांचा बैलपोळा सण होणार अंधारात साजरा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अंबड : महावितरण कंपनीच्या अधिकार्‍यांच्या मनमानी कारभारामुळे  पारनेर येथे सहा दिवसापासुन लाईट नसल्यामुळे गावकर्‍यांचा बैलपोळा सणही अंधारात जाणार असल्यामुळे ग्रामस्त त्रस्त झाले आहेत. सतत होणार्‍या पावसाने पारनेर येथील नदीला पुर आल्यामुळे पारनेर गावाला होणार्‍या वीज पुरवठ्याचे खांब पडल्याने गावातील वीजपुरवठा खंडीत झाला.

हेही वाचा: जरंडी परिसरात मुसळधार; पुराच्या पाण्यात ४२ वर्षीय तरुण गेला वाहून

वीजखांब दुरुस्तीचे काम महावितरण कंपनी अनेक दिवसापासुन कासव गतीने करत आहे. गावात सहा दिवसापासुन वीज नसल्यामुळे गावकरी अंधारात आहेत. गावकर्‍यांना दळण व मोबाईल चार्जींगसाठी दुसर्‍या गावात जावे लागत आहे. महावितरण कंपनीच्या अधिकार्‍यांनी विजेच्या खांबाची दुरुस्ती करुन विज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी संदीप गाडेकर, पाडुरंग खरे, बाळासाहेब जोशी, किसन धुळे, विठ्ठल खरात, संदीप तिडके, काकासाहेब केदारे आदी जणांनी केली आहे.

loading image
go to top