औरंगाबाद - महमूद दरवाजाचे कवाड कोसळले

संकेत कुलकर्णी
शुक्रवार, 22 जून 2018

औरंगाबाद : ऐतिहासिक पाणचक्कीजवळील महमूद दरवाजाचे लाकडी कवाड शुक्रवारी (ता. 22) सकाळी कोसळले. सात वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे शाळकरी मुले, नोकरदारांची मोठी धांदल उडाली. सुदैवाने यात कुणी जखमी झाले नाही.

मलिक अंबराने उभारलेल्या नवखंडा पॅलेसचाच एक भाग असलेला महमूद दरवाजा खाम नदीच्या काठावर उभा आहे. हा दरवाजा अतिशय जीर्ण झाल्यामुळे अनेकदा त्याची डागडुजी करण्यात आली होती. दोन्ही बाजूंनी काँक्रीटचे पिलर उभारून त्याला आधार देण्यात आला आहे. मात्र अजूनही त्याच्या कमानीच्या दगडांना गेलेले तडे आणि त्यावर उगवलेली झाडे पाहता वेळीच दुरुस्ती न केल्यास मोठी हानी होऊ शकते, अशी भीती 'सकाळ'ने अनेकदा व्यक्त केली होती. 18 मे रोजी जागतिक वारसा दिनी 'सकाळ'ने यासंबंधी वृत्त प्रकाशित केले होते. अखेर आज त्याचे लाकडी कवाड कोसळलेच.

वारंवार ट्राफिक जाम
पाणचक्कीजवळ या अरुंद दरवाजात आणि खाम नदीवरील अरुंद पुलामुळे वारंवार वाहतुकीचा खोळंबा होतो. त्याला पर्यायी रस्ता तयार करावा अशी मागणी अनेकदा करण्यात आली होती.

Web Title: part of mahmud door destroys in aurangabad

टॅग्स