आंध्रप्रदेशातून पळविलेल्या बसचा सांगाडा नांदेडात जप्त

nanded
nanded

नांदेड : आंध्रप्रदेशातून मेट्रो एक्सप्रेस बस आंतरराज्य चोरट्यांनी विक्री करण्याच्या उद्देशाने बुधवारी (ता. 24) पळवून आणली होती. ती बस स्थानिक गुन्हे शाखा व आंध्र पोलिस यांनी पाठलाग करून काकांडी (ता. नांदेड) शिवारातून गुरूवारी (ता. 25) जप्त केली. यावेळी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. 

टीएसआरटीसी मेट्रो एक्सप्रेस बस (टीएस 11 -झेड-6254) ही अफजलगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरट्यांनी पळविली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आंध्र पोलिसांनी तपासाटी चक्रे वेगाने फिरवत सीसीटीव्ही फुटेज तपासले. यावेळी चोरट्यांनी पळविलेली बस ही निर्मल, भैसा मार्गे भोकरला आणली. परंतु रस्त्यातच ही बस बंद पडल्याने टोईंग लावून तीला काकांडी शिवारात एका फार्म हाऊसवर आणण्यात आले. सदरची बस ही फुटेजमध्ये नांदेड सिमेवर असलेला बेल्टा रोड दत्तात्र्य मंदीर येथे बुधवारी (ता. 24) पहाटे पाचच्या सुमारास आल्याचे समजले. यावेळी पोलिस अधिक्षक संजय जाधव यांच्याशी आंध्र पोलिसांनी संपर्क साधला. 

जाधव यांनी अतिरिक्त पोलिस अधिक्षक डॉ. अक्षय शिंदे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनील निकाळजे यांना सुचना दिली. त्यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद दिघोरे यांच्या पथकाला सतर्क केले. त्यांनी आपले सहकारी बालाजी सतपुते, जावेद, राजू पांगरीकर, ब्रम्हानंद लामतुरे, तानाजी येळगे यांच्यासह पथकांनी आंध्र पोलिसांना सोबत घेऊन गुप्त माहितीवरुन काकांडी शिवारात शोध घेतला. फारूख यांच्या फार्म हाऊसवर बसची तोडफोड करणे सुरू होते. पोलिसांनी सापळा लावून पाच जणांना ताब्यात घेतले. चक्क बस पळविणारी टोळी सक्रीय झाल्याने पोलिस यंत्रणेच्या भूवया उंचावल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com