एप्रिलपासून शहरातच काढा पासपोर्ट! 

आदित्य वाघमारे - सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

औरंगाबाद - पासपोर्टसाठी औरंगाबादकरांना मुंबईला मारावे लागणारे खेटे येत्या एप्रिल महिन्यापासून बंद होणार आहेत. 31 मार्चपर्यंत हे कार्यालय सुरू करण्याचे आदेश केंद्र सरकारतर्फे मुंबईतील विभागीय कार्यालयाला देण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

पासपोर्ट तयार करण्यासाठी शहरातील नागरिकांना ऑनलाइन नोंदणी करावी लागते आणि त्यानंतर पुढील कारवाईसाठी मिळालेल्या वेळेनुसार मुंबई येथील कार्यालयात जावे लागते. त्यासाठी औरंगाबादकरांचा प्रवासासह अन्य खर्च आणि वेळ जात होता. आता औरंगाबादकरांचे हे खेटे आणि होणारा ताप थांबणार आहे. औरंगाबादेत हे कार्यालय येत्या एप्रिल महिन्यात सुरू होणार आहे. 

औरंगाबाद शहरात पासपोर्ट कार्यालय द्यावे, अशी मागणी संपूर्ण मराठवाड्यातून करण्यात आली होती. जनरेटा पाहता मुंबई येथील विभागीय कार्यालयाच्या पथकाने औरंगाबादेत नियोजित जागांची पाहणी केली होती. छावणीतील पोस्ट मास्टर जनरल यांच्या कार्यालयातील जागेला यासाठी पसंती देण्यात आली. 2017 च्या सुरवातीला हे कार्यालय सुरू करण्यात येणार असल्याची माहिती या विभागीय कार्यालयातून देण्यात आली होती; पण देशभरात एकाच वेळी ही कार्यालये सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारतर्फे घेतला गेला. या कार्यालयाचे काम मार्च महिन्यात पूर्ण करून ते सुरू करण्याचे आदेश मुंबई कार्यालयास मिळाले आहेत. त्यामुळे आता हे कार्यालय एप्रिलपासून कार्यान्वित होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

अख्त्यारितील जिल्हे कोणते? 
मराठवाड्यासाठी स्वतंत्र पासपोर्ट कार्यालय असावे, अशी मागणी येथील रहिवाशांनी केली होती. त्यांच्या मागणीला यश आले आणि हे कार्यालय औरंगाबादेत कार्यान्वित करण्यात येणार आहे. असे असले तरी या कार्यालयाची हद्द काय, याबाबत कोणाताही खुलासा अद्याप विभागीय पसपोर्ट कार्यालयातर्फे करण्यात आलेला नाही. औरंगाबादशिवाय मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यांचा समावेश यात करण्यात आला तर त्याचा फायदा येथील नागरिकांना होईलच; पण मुंबई आणि अन्य विभागीय कार्यालयांचा भारही कमी होणार आहे. 

Web Title: passport card in city