परभणीत सुरु होणार पासपोर्ट सुविधा

Passport facility will be started in Parbhani
Passport facility will be started in Parbhani

परभणी : उस्मानाबाद नंतर आता परभणीतही पासपोर्ट सेवा देण्यासाठी कार्यालय उघडले जाणार आहे. यास संबंधीत विभागाने संमती दिली आहे. परभणीचे खासदार संजय जाधव यांनी या संदर्भात सातत्याने पुढाकार घेतला होता.

परभणी येथे पासपोर्ट कार्यालय व्हावे, अशी येथील नागरीकांची मागणी होती. आता पर्यत पासपोर्टसाठी नागपूर येथे जावे लागत असे. परंतू आता ही सुविधा परभणीतच दिली जाणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाने या संदर्भात पत्र काढले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे जॉईन्ट सेक्रेटरी अरूण चटर्जी यांनी हे पत्र काढले आहे. या पत्रात पासपोर्ट कार्यालयाची सेवा उस्मानाबाद नंतर परभणी येथे सुरु करावी असे म्हटले आहे. हे कार्यालय परभणी येथे कार्यान्वीत करण्यात यावे यासाठी येथील पोस्ट कार्यालयास परराष्ट्र मंत्रालयाने ऑगस्ट 2018 मध्ये पत्र दिले होते. त्यानंतर पोस्ट कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांचे या संदर्भात ट्रेनिंग सुध्दा झालेले आहे. येत्या 10 ते 15 दिवसात हे सेवा परभणी पोस्ट कार्यालयात कार्यान्वीत केली जाईल. या संदर्भात परभणीचे खासदार संजय जाधव यांनी सातत्याने परराष्ट्र मंत्रालयाकडे पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले आहे. परभणीच्या मुख्य डाक घरात ही सुविधा दिली जाणार आहे. त्यासाठी दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे. पोस्ट कार्यालयात जागा देखील तयार करण्यात आली असून येत्या 15 दिवसात या सुविधेचे उद्घाटन केले जाईल, अशी आशा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com