पासपोर्ट कार्यालय सुरू झाल्याने बीडकरांची सोय

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 एप्रिल 2018

बीड - शहरात २९ मार्चपासून सुरू झालेल्या पासपोर्ट कार्यालयाचा ५०० बीडकरांना फायदा झालेला आहे. पूर्वी पासपोर्टसाठी औरंगाबाद, पुणे, मुंबई व सोलापूर याठिकाणी जावे लागत होते. मात्र, शहरात सुरू झालेल्या पासपोर्ट कार्यालयामुळे बीडकरांची ही बाहेर जाण्याची वारी टळली आहे. हज यात्रेकरूंनासुद्धा याचा फायदा होताना दिसत आहे. 

विदेशात फिरण्यासाठी किंवा खासगी कारणाने जावे लागते. यासाठी पासपोर्टची आवश्‍यकता असते; परंतु पूर्वी पासपोर्ट काढण्यासाठी परजिल्ह्यात जावे लागत होते. जर हे काम एका वेळेस झाले नाही, तर एक-दोन चकरा माराव्या लागत होत्या. मात्र, २५ दिवसांपूर्वी शहरात सुरू झालेल्या पासपोर्ट कार्यालयाचा फायदा येथील नागरिकांना होत असून दिवसभरात ५० जणांना पासपोर्टचा फायदा होत आहे. पहिले काही दिवस दररोज २५ ते ३० जणांना पासपोर्टसाठी बोलवण्यात येत होते. सध्या या कार्यालयात तीन कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सर्व कामे केली जात आहेत. भविष्यात यात बदल करून येथील मनुष्यबळ वाढविण्यात येईल, असे येथील अधिकाऱ्यांनी सांगितले.

कमी पैशांत पासपोर्ट
पूर्वी पासपोर्ट काढण्यासाठी मुंबईच्या तीन-चार वाऱ्या कराव्या लागत होत्या. यामुळे पासपोर्ट काढण्यासाठी बीडकरांना जास्त पैसे लागत होते; परंतु आता फक्त १५०० रुपयांमध्ये नागरिकांना पासपोर्ट मिळत असल्याने त्याचा फायदा बीडकरांना होताना दिसत आहे. यामुळे एक तर वेळ वाचतो व दुसरी गोष्ट म्हणजे जास्त जाणारे पैसे वाचत आहेत. यामुळे बीडला पासपोर्ट कार्यालय सुरू झाल्यामुळे येथील नागरिकांना त्याचा जास्त फायदा होताना दिसत आहे.

Web Title: passport office is started in beed