उच्चशिक्षित शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

पाथरी - नापिकीला कंटाळून उच्चशिक्षित तरुण शेतकऱ्याने घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बाभळगाव (ता. पाथरी) येथे सोमवारी (ता. 23) दुपारी बाराच्या सुमारास घडली. बाळासाहेब रणेर (वय 32) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. बाभळगाव येथील निवृत्ती रणेर यांना चार मुले आहेत. त्यातील बाळासाहेब रणेर हे एमए बीएड झालेले असून, नोकरी नाही. त्यामुळे काही दिवसांपासून ते शेती करत होते. त्यांच्या नावे तीन एकर शेती असून, त्यांच्यावर बॅंक, सोसायटीचे सुमारे पावणेदोन लाखांचे कर्ज आहे. नापिकी, आर्थिक विवंचनेतून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले.
Web Title: pathari marathwada news farmer suicide