या शहरात आहे महा"खड्डे'मार्ग

चाकूर : लातूर-नांदेड महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका निर्माण झाला आहे.
चाकूर : लातूर-नांदेड महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका निर्माण झाला आहे.

चाकूर: शहरातून जाणारा लातूर-नांदेड महामार्ग सध्या खड्ड्यांत हरवला आहे. या रस्त्यापुढे गावांतील रस्ते बरे असे म्हणण्याची वेळ आली आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांतून वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत असून हा रस्ता आता महा"खड्डे'मार्ग झाला असल्याचे नागरिकांतून म्हटले जात आहे. 


चाकूर शहरातून जाणाऱ्या लातूर-नांदेड महामार्गाची खड्ड्यांनी दुरवस्था केली आहे. या खड्ड्यांमुळे लहानमोठ्या अपघाताच्या घटना नित्याच्याच आहेत. या रस्त्यावरून प्रचंड धूळ उडत असून याचा त्रास पादचारी, दुचाकीस्वार आणि रस्त्यालगतच्या व्यापाऱ्यांना होत आहे. 


शहरातीलच नव्हे, तर लातूरपासून नांदेडपर्यंत जाणाऱ्या या महामार्गाची दयनीय अवस्था झाली आहे. या महामार्गापेक्षा खेडेगावांना जाणारे रस्ते चांगले आहेत अशी म्हणण्याची वेळ वाहनधारकांवर आली आहे.

या खराब रस्त्यामुळे वाहन देखभाल-दुरुस्तीचा खर्च वाढला आहे. त्यामुळे वाहनधारकांनी चाकूर-लातूर, चाकूर-नांदेड रस्त्यावर वाहतुकीचे दर वाढवले असून अपघातामुळे रात्रीचा प्रवास टाळला जात आहे.

या महामार्गावर नियमित अपघात होत असतात. त्यात काहींना आपले प्राणही गमवावे लागत आहेत. चाकूर तहसील कार्यालयासमोरून जाणारा महामार्ग खड्ड्यांत हरवल्यामुळे वाहनधारक नाइलाजाने औद्योगिक वसाहतीमधून जाणारा रस्ता वापरत आहेत. 


खराब झालेल्या या महामार्गामुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून पाठदुखी, मणक्‍याच्या आजारांच्या तक्रारी वाढत आहेत. तातडीने खड्डे बुजवून वाहनचालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. 

संथगतीने काम 
भूस्थल परिवहन मंत्रालय भारत सरकार यांच्याकडून औसा ते नांदेड महामार्गासाठी पाच हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या महामार्गावर अतिशय संथगतीने काम सुरू असल्यामुळे वाहनधारकांना खड्ड्यांच्या व धुळीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com