'डॉन' असल्याचे सांगत घाटी रुग्णालयात डॉक्टरला मारहाण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

औरंगाबाद  : रुग्णाच्या नातेवाईकांकडून घाटी रुग्णालयातील एका निवासी डॉक्टरला मारहाण झाल्याची घटना बुधवारी (ता. 25) रात्री अकराच्या सुमारास घडली. यानंतर घाटीतील निवासी डॉक्टर रात्रीपासून मास बंक वर गेले.

 घाटी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या माहितीनुसार, डॉ. हर्षद चव्हाण असे मारहाण झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. ते बुधवारी रात्री ड्युटीवर असताना काहीजण रुग्णांना घेऊन घाटी रुग्णालयात आले.

डॉ. चव्हाण त्या रुग्णाला तपासत होते, परंतु रुणाच्या 20 ते 25 नातेवाईकांचा गराडा झाल्याने चव्हाण यांनी मोजकेच लोक थांबा बाकीचे बाहेर थांबा असे सांगितले. यामुळे संतप्त नातेवाईकाने आपण डॉन आहोत, तुम्ही कुणाला जाण्याचे सांगत आहात, असे धमकावत इतरांच्या मदतीने मारहाण केली.

यावेळी एका सहयोगी प्राध्यापकाला जमावाने धक्काबुकी केली. या घटनेनंतर रात्री उशिरापर्यंत तसेच गुरुवारी (ता. 26) पहाटेपासून अपघात विभागासमोर निवासी डॉक्टर एकत्र येऊन घोषणा देत आहेत. त्यांनी सतत होणाऱ्या मारहाणीचा निषेध केला आहे. सर्व व्यवस्थित करूनही मारहाण केली जात असल्याने असुरक्षित वाटत असल्याचे निवासी डॉक्टरांचे म्हणणे आहे.

Web Title: Patients relatives beat doctor on duty in Ghati Hospital