esakal | Patoda: आत्महत्या करणाऱ्या ग्रामसेवकाचा मृतदेह सापडला आठ दिवसांनी
sakal

बोलून बातमी शोधा

आत्महत्या करणाऱ्या ग्रामसेवकाचा मृतदेह सापडला आठ दिवसांनी

पाटोदा : आत्महत्या करणाऱ्या ग्रामसेवकाचा मृतदेह सापडला आठ दिवसांनी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पाटोदा : सौताड्याच्या रामेश्वर धबधब्यामध्ये उडी घेऊन आत्महत्या करणाऱ्या ग्रामसेवकाचा मृतदेह तब्बल आठ दिवसानंतर सापडला आहे. पाटोदा पोलिस, आपत्ती व्यवस्थापनाचे जवान, ग्रामस्थ आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी एकत्रित प्रयत्न करूनही मृतदेह सापडत नसल्याने यंत्रणा अक्षरशः हतबल झाली होती. मात्र अखेर शनिवारी नदीमध्ये मृतदेह तरंगताना आढळून आला.

अहमदनगर जिल्ह्यातील मांडवगण येथील ग्रामसेवक झुंबर मुरलीधर गवांडे यांनी ता.२४ सप्टेंबर रोजी पाटोदा तालुक्यातील सौताडा धबधब्यावरून उडी मारून येथील दरीत आत्महत्या केली होती. यानंतर पोलिसांनी त्यांचा दरीत मृतदेह शोधण्यासाठी शोधमोहीम सुरु केली, मात्र त्यांच्या मृतदेहाचा शोध लागत नव्हता. दरम्यान शनिवारी तब्बल आठ दिवसानंतर त्यांचा मृतदेह नदीत आढळून आला आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण येथील रहिवासी असलेले ग्रामसेवक गवांदे हे मांडवगण जवळच असणाऱ्या खांडगाव (ता. श्रीगोंदा) येथेच कार्यरत होते. त्यांनी पाटोदा तालुक्यातील सौताडा येथील धबधब्यावरून आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली होती. यानंतर त्यांचा पोलिस सातत्याने शोध घेत असताना देखील मृतदेह आढळून आला नव्हता. मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे शोधकार्य करताना अडथळे निर्माण होत होते. अखेर आठ दिवसानंतर ग्रामसेवक गवांदे यांचा मृतदेह दरीत आढळून आहे.

loading image
go to top