वेतन साडेपाच हजार; उलाढाल कोट्यवधींची! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

माजलगाव (जि. बीड) - साडेपाच हजार रुपये मासिक वेतन असलेल्या एखाद्या कामगाराच्या नावाने बॅंकांमध्ये तब्बल दीड ते पावणेदोन कोटी रुपयांचे व्यवहार होत असल्याचे ऐकून कोणीही थक्क होईल. पण, असा प्रकार येथे उघडकीस आला आहे. प्राप्तिकर विभागाच्या नोटिसीनंतर या प्रकाराला तोंड फुटले. मालकाने धमकावून परस्पर व्यवहार केल्याची तक्रार नोकराने पोलिसांत दिली. दरम्यान, येथील दुग्गड उद्योग समूहावर प्राप्तिकर विभागाने मंगळवारी (ता. 27) छापे टाकले. 

येथे दुग्गड उद्योगसमूहाचे विनिता ऑइल रिफायनरी ऍन्ड दुग्गड उद्योग, नवकार ट्रेडर्स, अरिहंत ट्रेडर्स असे विविध व्यवसाय आहेत. संजय सदाशिव जाधव हे सहा वर्षांपासून विनिता ऑइल रिफायनरीमध्ये मासिक साडेपाच हजार रुपये वेतनावर काम करतात. समूहाच्या मालकाने संजय जाधव यांच्या नावाने स्टेट बॅंक ऑफ इंडिया बॅंकेत खाते उघडून कोऱ्या धनादेशांवर स्वाक्षऱ्या घेतल्याची तक्रार जाधव यांनी पोलिसांत केली. या धनादेशाच्या माध्यमातून मालकाने परस्पर बॅंकेत व्यवहार केले. या खात्यावर 2012 - 13 मध्ये एक कोटी 66 लाख 64 हजार 961, 2013-14 मध्ये एक कोटी 89 लाख 19 हजार 70 रुपयाची उलाढाल केली आहे. खासगी कामासाठी हवे म्हणून जाधव यांच्याकडून आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स व फोटो घेतले. या कागदपत्रांच्या आधारे येथील रेणुकामाता मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटीत खाते (क्रमांक 285) उघडून एक कोटी 82 लाख 70 हजार 70 रुपयांचा व्यवहार केला. दरम्यान, संजय जाधव यांना 12 मार्च 2015 ला प्राप्तिकर विभागाची नोटीस आल्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला. 

Web Title: Pay five thousand; Turnover worth millions