esakal | उदगीरात श्रीगणेशा प्रमाणे देवीचेही जागेवरच विसर्जन
sakal

बोलून बातमी शोधा

Udgeer Comeeti.jpg

शांतता कमिटीत उपजिल्हाधिकारी मेंगशेट्टी यांनी नवरात्र मंडळांना केले सहकार्य.  

उदगीरात श्रीगणेशा प्रमाणे देवीचेही जागेवरच विसर्जन

sakal_logo
By
युवराज धोतरे

उदगीर (लातूर) : श्रीगणेशा प्रमाणे नवरात्र महोत्सवातील मंडळांनी देवीचेही जागेवरच विसर्जन करावे. कोरोना संसर्गजन्य परिस्थितीत प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांनी केले आहे.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!


शुक्रवारी (ता.२३) येथील शहर पोलीस ठाण्यात नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. उपविभागीय पोलिस अधिकारी मधुकर जवळकर, शहर पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक गजानन पाटील, सहदेव खेडकर, नवरात्र महोत्सवातील विविध मंडळांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

यावेळी श्री मेगशेट्टी म्हणाले, गणेश विसर्जनाच्या काळात शहरातील मंडळाने जागेवरच श्रीगणेशाचे विसर्जन करून जिल्ह्यात एक वेगळा आदर्श निर्माण केला होता. त्याच पार्श्वभूमीवर शहरातील सर्व नवरात्र मंडळांनी आपापल्या देवींचे विसर्जन हे जागेवर करावे नगरपालिकेकडून जागेवर विसर्जन करण्याची व्यवस्था ट्रॅक्टरद्वारे करण्यात येईल.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

शहरात एकूण अकरा नवरात्र मंडळांनी देवीची स्थापना केली आहे. शहरातील दसरा महोत्सव रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे रावण दहनाचा कार्यक्रम होणार नाही. या अकरा मंडळांचे विसर्जन जागेवरच करण्याची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात येईल, त्या सर्वांनी प्रतिसाद द्यावा. यावेळी पोलीस उपाअधीक्षक श्री जवळकर व पोलीस निरीक्षक श्री चव्हाण यांनी केले.  या शांतता समितीच्या बैठकीसाठी नामदेव भंडारे, संतोष दुबळगुंडे, राजू घोरपडे आदींनी पुढाकार घेतला.

(संपादन-प्रताप अवचार)