कथाचोरीप्रकरणी चित्रपट निर्मात्याला दंड

कथाचोरीप्रकरणी चित्रपट निर्मात्याला दंड

औरंगाबाद - चित्रपटाची कथा चोरी केल्याप्रकरणी सुरू असलेल्या सुनावणीला चित्रपट निर्माते-दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा वारंवार गैरहजर राहिल्याने प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एच. एस. पुरडउपाध्ये यांनी त्यांच्याविरोधात वॉरंट जारी केले होते. त्यानुसार मेहरा शुक्रवारी न्यायालयात हजर झाले. यापुढे नियमित हजर राहण्याची हमी दिल्यानंतर न्यायालयाने वॉरंट रद्द करून त्यांना पाच हजार रुपयांचा दंड केला.

औरंगाबाद येथील कथाकार मुश्‍ताक मोसीन यांनी मेहरा यांच्यावर "रंग दे बसंती' आणि "दिल्ली-6' या चित्रपटांच्या कथा चोरल्याचा आरोप केलेला आहे. मोसीन यांनी त्यांच्या अनेक कथांची अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये (एबीसीएल) नोंदणी केली होती. राकेश ओमप्रकाश मेहरा हेदेखील "एबीसीएल'चे सदस्य होते.

\याप्रकरणी मोसीन यांनी प्रतिवादी राकेश ओमप्रकाश मेहरा आणि यूटीव्हीचा निर्माता रॉनी स्क्रुवाला यांच्याविरोधात दावा दाखल केला. मेहरा यांनी सदरील दोन्ही चित्रपटांच्या निर्मितीपूर्वी कथाकार मुश्‍ताक मोसीन यांची पूर्वपरवानगी घेतली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com