अनधिकृत धावणाऱ्या रिक्षांवर दंडात्मक कारवाई 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 मे 2018

औरंगाबाद - जिल्ह्यात अनधिकृतपणे विनापरवाना प्रवासी वाहतूक करणाऱ्या 105 रिक्षा "आरटीओ'च्या भरारी पथकाने जप्त केल्या होत्या. रिक्षामालकांकडून 85 हजार रुपये एवढी दंडाची रक्कम वसूल केल्यानंतर या रिक्षा सोडण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी ऑटो रिक्षा व टॅक्‍सी परवाना खुला करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे अनधिकृत रिक्षांना अधिकृत करणे आवश्‍यक होते. ता. 31 मार्चपर्यंत राज्यातील ऑटो रिक्षा, टॅक्‍सीला एक वर्षासाठीचे एक हजार रुपये दंडात्मक शुल्क आकारून परमिट अधिकृत करून देण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. मात्र, ही संधी देऊनही अनेक रिक्षाचालकांनी त्याकडे पाठ फिरवून अनधिकृतपणे प्रवासी वाहतूक सुरूच ठेवली होती. त्यामुळे राज्य शासनाने दिलेली मुदत संपल्यानंतर अशा बेकायदा रिक्षांवर थेट कारवाई करण्याचे आदेश परिवहनमंत्र्यांनी राज्यातील आरटीओ विभागाला दिले होते. त्यानुसार औरंगाबाद आरटीओ कार्यालयाने धडक मोहीम राबवून तब्बल 105 रिक्षा जप्त केल्या. या रिक्षांकडून 85 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. 

Web Title: penalty illegal auto rickshaw driver