औरंगाबादच्या जनतेने शांतता राखावी - धनंजय मुंडे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 मे 2018

मुंबईः  औरंगाबादच्या जनतेने शांतता राखायला हवी. कुठल्याही प्रकरच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले आहे. औरंगाबाद येथे शुक्रवारी (ता. 11) रात्री दोन समूहामध्ये दंगल झाली होती, त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

काही मोहिमा राबवत असताना, तसेच नाजूक आणि वादग्रस्त विषय हाताळत असताना प्रशासनाने आणि पोलिसांनी योग्य ती काळजी घ्यायला हवी. अशावेळी स्थानिक लोकांना विश्वासात घेणे गरजेचे असते,  असेही मुंडे म्हणाले.

राज्यात मागील काही काळात सातत्याने अशा घटना घडत असतांना सरकारच्या गुप्तचर यंत्रणा काय करत आहेत? असा प्रश्नही मुंडे यांनी यावेळी उपस्थित केला. हे गुप्तचर खात्याचे अपयश आहे. दोन व्यक्तींचा जीव जातो, अनेक लोक जखमी होतात ही गंभीर बाब आहे, या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. 
 
Web Title: People of Aurangabad should keep silence says dhananjay munde