श्रमदानातून बांधला दगडी बंधारा 

वृत्तसंस्था
सोमवार, 30 जानेवारी 2017

ईट - गिरवली (ता. भूम) येथील ग्रामस्थांनी रविवारी (ता. 29) एकत्र येऊन श्रमदानातून दगडी बंधारा बांधला. पाणी फाउंडेशनअंतर्गत सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत भूम तालुक्‍याने सहभाग नोंदविला आहे.

त्या पार्श्‍वभूमीवर ओघळ नियंत्रणासाठी हा छोटा दगडी बंधारा बांधण्यात आला. या वेळी पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक राजाभाऊ कदम, कृषी सहायक अण्णासाहेब खटाळ, ग्रामपंचायत सदस्य देवराव मोटे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बब्रुवान मोटे, किशोर मोटे यांच्यासह ग्रामस्थांनी दोन तास श्रमदान केले. 
 
Web Title: people come together to build a dam