डिजिटल पेमेंट करणाऱ्यांना कॅशबॅकचा आधार

प्रकाश बनकर
सोमवार, 29 जुलै 2019

औरंगाबाद : केंद्र सरकारने वर्ष 2016 मध्ये नोटाबंदी केल्यानंतर डिजिटल व्यवहाराला प्राधान्य दिले होते. यासाठी विविध ऑफर्सही जाहीर केल्या होत्या. तेव्हापासून देशात डिजिटल पेमेंटबरोबर ऑनलाइन आणि फोन बॅंकिंगच्या व्यवहारात वाढ झाली आहे. त्याच बरोबर इंधन भरण्यापासून ते सिनेमाचे तिकीट बुकिंग करण्यासाठी आता क्रेडिट आणि डेबिट कार्डचा वापर होत आहे.

याच क्रेडिट आणि डेबिट कार्डवर व्यवहार करणाऱ्यांना कॅशबॅक मिळत आहे. याचा सर्वाधिक फायदा इंधन भरणाऱ्यांना होऊ लागला आहे. दोनशे रुपयांमागे दोन ते तीन रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळत आहे. 

केंद्र शासनाने आठ नोव्हेंबर 2016 ला पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या. या निर्णयानंतर कॅशलेस व्यवहारास सरकारने प्राधान्य दिले. क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या माध्यमातून सर्वच ठिकाणी व्यवहार होतील अशी सुविधाही सरकारी बॅंका यांच्यातर्फे उपलब्ध करून देण्यात आली. यांचा परिणाम गेल्या तीन वर्षांत दिसून येत आहे. कॅशलेस व्यवहार करण्याची संख्या वाढली आहे. फोन पे, गुगल पे, पेटीएम, ट्रू कॉलर, व्हॉट्‌सऍप यासह इतर पॉकेट मनीच्या माध्यमातून अनेक जण व्यवहार करीत आहेत. यातून कॅशबॅकचा फंडा सुरू झाला आहे. यामुळे नगद व्यवहार कमी करण्यास मोठी मदतही झाली आहे. 

असा मिळतो कॅशबॅक 
सध्या पेट्रोल पंपावर इंधन भरणाऱ्यांनी क्रेडिट अथवा डेबिट कार्डने इंधन भरल्यास त्यास कॅशबॅक मिळत आहे. यात प्रामुख्याने दोनशे रुपयांचे इंधन कार्डच्या माध्यमातून भरल्यास त्यांना दीड रुपया कार्ड स्वॅप करताना, तर दीड रुपया बॅंकेच्या माध्यमातून मिळत आहे. तीनशे रुपयांचे इंधन भरल्यास दोन रुपये 25 पैसे कॅशबॅकच्या स्वरूपात ग्राहकांच्या खात्यावर जमा होऊ लागले आहेत.

ग्राहकांच्या दृष्टीने फायदेशीर असलेल्या या प्रकाराकडे ग्राहकांचा कल वाढत आहे. मुळात शहरातील अनेक एटीएमवर पैसे उपलब्ध नसतात. यामुळे कार्डचा वापर वाढल्याने त्याचे फायदे मिळत आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: people opting for digital payment methods get cashback