सत्ताधारी बनविताहेत संवैधानिक संस्थांना गुलाम 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 डिसेंबर 2018

अरुंधती रॉय - सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे अधिवेशन 

औरंगाबाद - विद्यापीठांवर अंकुश लावल्यानंतर आता रिझर्व्ह बॅंक, सीबीआय, कॅग अशा संवैधानिक संस्थांना सरकारचे गुलाम बनविले जात आहे, अशी टीका लेखिका अरुंधती रॉय यांनी केली. संविधान कागदोपत्री बदलण्यात येत नसले, तरी कोणत्याही क्षणी त्याची प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते, असेही त्या म्हणाल्या. 

अरुंधती रॉय - सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे अधिवेशन 

औरंगाबाद - विद्यापीठांवर अंकुश लावल्यानंतर आता रिझर्व्ह बॅंक, सीबीआय, कॅग अशा संवैधानिक संस्थांना सरकारचे गुलाम बनविले जात आहे, अशी टीका लेखिका अरुंधती रॉय यांनी केली. संविधान कागदोपत्री बदलण्यात येत नसले, तरी कोणत्याही क्षणी त्याची प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते, असेही त्या म्हणाल्या. 

भारिप बहुजन महासंघप्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन या संघटनेचे दोनदिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात सुरू आहे. अधिवेशनाचे उद्‌घाटन माजी न्यायमूर्ती सुरेश, अभय ठिपसे, लेखिका अरुंधती रॉय, शिक्षणतज्ज्ञ अनिल सद्‌गोपाल, महेश भारतीय, प्रकाश इंगळे यांच्या उपस्थितीत झाले. 

या वेळी न्या. अभय ठिपसे म्हणाले, ""गाय, बैल वाचविण्यापेक्षा माणूस वाचविणे महत्त्वाचे असल्याचा निर्णय एका खटल्यात दिला होता. त्यावर अनेकांनी टीका केली. आज वकिलांमध्येही जातीचे कंपू निर्माण झाले आहेत. काहींना देशाला हिंदुराष्ट्र बनवायचे आहे. हिंदुराष्ट्र झाले तर ते संकट असेल.'' 

शिक्षणतज्ज्ञ अनिल सद्‌गोपाल म्हणाले, ""देशातील शिक्षणव्यवस्था उद्‌ध्वस्त केली जात आहे. पाचवी, सातवी नापास झाले की कौशल्य विकासाच्या नावाखाली आपल्याला शिक्षण व्यवस्थेतून बाजूला केले जात आहे. उच्च शिक्षण महागडे केल्यामुळे तिथपर्यंत पोचण्याऐवजी बहुजन विद्यार्थी कौशल्य विकासाचे बळी पडत आहेत.'' 

प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू न शकलेल्या न्या. पी. बी. सावंत यांचे लिखित भाषण यावेळी वाचून दाखविण्यात आले. अध्यक्षीय समारोप न्या. सुरेश यांनी केला. प्रास्ताविक प्रदेशाध्यक्ष महेश भारतीय यांनी केले. मंचावर भारिप बहुजन महासंघाचे अमित भुईगळ, डॉ. वाल्मीक सरवदे, कृष्णा बनकर उपस्थित होते. या अधिवेशानात 40 पेक्षा अधिक ठरावही मंजूर करण्यात आले. 

राज्याचा कारभारी रबर स्टॅम्प नको - प्रकाश आंबेडकर 
राज्याचा कारभारी रबर स्टॅम्प नको असेल, तर युवकांनी दक्ष राहिले पाहिजे, असे आवाहन भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. विद्यार्थी चळवळींनी स्वत:पुरते मर्यादित राहू नये. राज्याचा कारभारी निवडण्याची वेळ आली, की क्रांतीची भाषा थंड होते आणि पाच वर्षे विरोध करणारेच पुन्हा सत्ताधीश बनतात, असा टोमणाही त्यांनी लगावला.
 

Web Title: people in power making constitutional institutions slaves