पैसे जमा करण्यासाठी रांगा कायम 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 नोव्हेंबर 2016

औरंगाबाद  - जुन्या हजार, पाचशे रुपयांच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर बहुतांश बॅंकांसमोरील गर्दी शुक्रवारीही (ता. 18) कायम होती. बॅंकांसमोर नोटा काढण्याऐवजी भरण्यासाठीच नागरिकांनी जास्त गर्दी
केली. मोजक्‍याच एटीएममध्ये कॅश उपलब्ध असल्याने तिथे लांबच रांगा लागल्या होत्या. ही कॅश काही तासांतच संपल्याने नागरिकांच्या पदरी निराशाच आली. 

गेल्या आठवडाभरापासून बॅंकांसमोर नागरिकांच्या रांगा आहेत. शहरातील काही महत्त्वाच्या राष्ट्रीयीकृत बॅंकांसमोरील गर्दी काही कमी झाली असली तरी सहकारी बॅंकांसमोर गर्दी कायम आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडिया, स्टेट
बॅंक ऑफ हैद्राबाद यांच्या काही शाखांसमोर नागरिकांच्या सकाळपासून रांगा होत्या. बहुतांश नागरिकांनी त्यांच्याकडील जुन्या हजार, पाचशे रुपयांच्या नोटा बदलून घेतल्या किंवा त्या खात्यात जमा केल्या आहेत.
त्यामुळे बॅंकांसमोर पूर्वीप्रमाणे गर्दी राहिलेली नाही. 

एटीएम "आउट ऑफ सर्व्हिस' 
शहरातील बहुतांश बॅंकांचे एटीएम आजही आउट ऑफ सर्व्हिस होते. बहुतांश एटीएममध्ये तांत्रिक बदल करण्यात न आल्याने ते शोभेचे बाहुले बनले होते. एमटीएममधून अजूनही शंभर रुपयांच्या नोटा निघत नसल्याने
नागरिकांना सुटे करण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. पैसे काढणाऱ्यांची रांग लांब असल्याने एटीएममधील कॅश हातोहात संपत आहे. 

बॅंकातून बोटाला शाई 
शुक्रवारी (ता.18) बॅंकांमधून नोटा बदलण्याची मर्यादा दोन हजार रुपये करण्यात आली होती. काही मोजक्‍याच बॅंकांनी नोटा बदलून देताना ग्राहकांच्या बोटाला शाई लावली; मात्र काही बॅंकांनी शाई न लावता थेट
खात्यात रक्कम जमा करून ती लगचेच काढून घेण्याची व्यवस्था केली होती. त्यामुळे अनेकजण खात्यात रक्कम जमा करून ती काढताना दिसत होते.

Web Title: Permanent queues to deposit money