वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेविरोधात याचिका

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 फेब्रुवारी 2017

औरंगाबाद - वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेतील अनागोंदी कारभाराच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल झाली. प्राथमिक सुनावणीत न्यायमूर्ती व्ही. एम. कानडे व न्यायमूर्ती एस. एस. पाटील यांनी राज्याचे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय आणि केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाला शुक्रवारी (ता. तीन) नोटीस बजावली आहे.

वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी राज्यपातळीवर 5 मे 2016 रोजी एमएचटी- सीईटी सामाईक प्रवेश परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर एक जूनला परीक्षेचा निकाल घोषित करण्यात आला. या परीक्षेतील प्राप्त गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची तरतूद आहे. त्यानुसार एमबीबीएस व बीडीएस या शाखेचे प्रवेश पूर्ण झाल्यानंतर बीएएमएस व होमिओपॅथिक शाखेची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. सामाईक परीक्षेतील प्राप्त गुणांवर प्रवेश देण्याचा नियम असताना 24 ते 29 नोव्हेंबर या काळात मुंबईतील पोदार महाविद्यालयात प्रवेश प्रक्रियेसाठी बोलाविण्यात आले.

त्यानंतर संकेतस्थळावर नोटीस टाकून दुसऱ्याच दिवशी विद्यार्थ्यांना नव्याने मान्यता मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेशासाठी बोलविले. त्यात श्रीमती विमलादेवी आयुर्वेद मेडिकल कॉलेज (चंद्रपूर), वामनराव इथापे होमिओपॅथिक महाविद्यालय (संगमनेर), काकासाहेब म्हस्के होमिओपॅथिक महाविद्यालय (नगर) या महाविद्यालयांचा समावेश होता; पण विद्यार्थ्यांना मुंबईतील फेरी संपवून दुसऱ्याच दिवशी या ठिकाणी पोचणे शक्‍य नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांना गुण मिळूनही प्रवेश घेता आला नाही. त्याविरोधात तेजस्वी बाबर या विद्यार्थिनीने याचिका दाखल केली होती. सुनावणीनंतर खंडपीठाने नोटीस बजावली.

Web Title: Petition against medical admission process