khandala village
sakal
- अनिल गाभुड
विहामांडवा - पैठण तालुक्यातील खंडाळा गावात बुधवार ता. २४ रोजी सकाळी पेट्रोलने भरलेल्या बाटलीचा भडका होऊन लागलेल्या आगीमध्ये एका घरात असलेले चार जण गंभीर जखमी झाले. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जखमींवर विहामांडवा येथे प्राथमिक उपचार करुण पुढील उपचाराकामी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.