पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात : कशामुळे ते वाचा

Nanded News
Nanded News

नांदेड : आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमती ६० डॉलरच्या खाली गेल्याने भारतीय पेट्रोलियम कंपन्यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे या कंपन्यांनी इंधन दर कपातीचे धोरण कायम ठेवले असून, सोमवारी (ता.२७ जानेवारी २०२०) पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये कपात करण्यात आली.  

नांदेडमध्ये रविवारी (ता.२६) पेट्रोल ८२.६०, सोमवारी (ता.२७) ८१.१३ तर मंगळवारी (ता.२८) ८१.०२ पैसे लिटरप्रमाणे मिळत होते. पैशाने का होईना पेट्रोलच्या किमती कमी होत असल्याने नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळत आहे. परंतु, ही कपात कायम ठेवावी अशी मागणी नागरिकांतर्फे केली जात आहे.

नागरिकांना दिलासा
एकीकडे महागाईनं हैराण झालेले असताना सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत कपात झाल्यानं सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती काही दिवसांपासून स्थिर असल्यामुळे हा परिणाम बघायला मिळत असल्याचे वितरकांनी सांगितले. पेट्रोलच्या किमती दिवसागणिक वाढत असल्याने व्यापाऱ्यांसह नागरिकांचेही आर्थिक गणित बिघडत चालले आहे. शिवाय महागाईलाही नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. परंतु, जानेवारी महिन्यापासून भारतीय पेट्रोल कंपन्यांनी इंधन दर कपातीचा घेतलेला निर्णय योग्य आहे. हा निर्णय असाच कायम ठेवावा. ज्यामुळे महागाई वाढणार नाही. अर्थातच सर्वसामान्यांचे जीवन सुसह्य होण्यास मदत होईल, अशा प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केल्या.

यामुळे होत आहे कपात
आंतरराष्ट्रीय कमॉडिटी बाजारात खनिज तेलाच्या किमती कमी होत असल्याने १२ जानेवारीपासून भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी इंधर दर कपातीचे धोरण अवलंबिलेले आहे. कमॉडिटी बाजारात खनिज तेल प्रति बॅरल ५९ डॉलरपर्यंत खाली आले आहे. सोमवारी (ता.२७ जानेवारी २०२०) त्यात १.१२ डॉलरची घसरण झाली आणि तो ५९.५७ डॉलरपर्यंत घसरला. खनिज तेलाचा आॅक्टोबरनंतरचा हा निचांकी स्तर आहे. आॅक्टोबरमध्ये खनिज तेल ५२.१५ डॉलरपर्यंत खाली घसरले होते. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरात कपात कायम ठेवली आहे. १२ जानेवारीपासून पेट्रोल दरात घसरण सुरु असल्याचे नांदेडमधील काही पेट्रोल पंप चालकांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

महागाईवर नियंत्रण हवे
दिवसेंदिवस पेट्रोलच्या किमती वाढत असल्याने किराणासह भाजी-पाल्यांचेही दर वाढत आहे. त्यामुळे गृहिणींचे बजेट विस्कटल्याने दररोज नव्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी पेट्रोल-डिझेलचे भाव स्थिर ठेवावेत.
- सुलोचनाबाई पाटील, श्रीनगर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com