पेट्रोल-डिझेलचा भडका सुरूच

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

वर्षात डिझेल ३० तर, पेट्रोल २१ टक्क्यांनी वाढले
औरंगाबाद - सत्ताधाऱ्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी जोडल्याने नियमित दरात बदल होत आहेत. सध्या सेल नसतानाही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढच होत आहे. वर्षभरात १३ रुपये ७९ पैशांनी डिझेल वाढले, तर ७ रुपये १२ पैशांनी पेट्रोलची दरवाढ झाली आहे. सोमवारी (ता. २७) डिझेल ७४.८५ रुपये, तर पेट्रोल ८६.४३ रुपयांनी विक्री झाले. ३१ ऑगस्टपर्यंत यात आणखी वाढ होण्याची शक्‍यता डिलर्सनी वर्तविली आहे.

यूपीए सरकारच्या काळात वर्षभरात केवळ सहा ते सात रुपये वाढ करण्यात येत होती; मात्र मार्च २०१४ पासून पेट्रोलचे दर झपाट्याने वाढत गेले. त्यावर्षी आंतरराष्ट्रीय बाजारात बॅरलचे दर कमी असतानाही पेट्रोल ८२.०७ पैसे प्रतिलिटरने विक्री झाले. ही दरवाढ झापाट्याने सुरू राहिली. तीन महिन्यांपूर्वी औरंगाबादेत पेट्रोलेचे दर ८७.०१ पैसे होते. डिसेंबर २०१४ ला डिझेल ५७.९१ रुपये होते ते १६.९४ रुपयांनी वाढून ७४.८५ रुपयांवर गेले.

आंतरराष्ट्रीय इंधनाच्या दराप्रमाणे पेट्रोल-डिझेलची दरवाढ करण्याचा सरकारने निर्णय घेतल्यापासून दरात वाढ आणि घट होत आहे. बॅरल आणि भारतीय रुपयांत यांची तुलना होत आहे. पूर्वीचे सरकार दरवाढीचे ओझे इंधन कंपन्यांवर टाकत होते. आता मात्र रोज दर बदलतात. यामुळे रोज पैशांमध्ये वाढ होते. ती कोणाच्याच लवकर लक्षात येत नाही. सध्या सेल कमी असतानाही दर वाढले आहेत.
- अकिल अब्बास, पेट्रोल डिलर असोसिएशन

Web Title: Petrol Diesel Rate Increase